Pravin Darekar : मुंबै बँक प्रकरणात भाजप नेते प्रवीण दरेकर यांना क्लीन चीट मिळाली आहे. यामुळे दरेकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या गु्न्हे शाखेने प्रवीण दरेकर यांना क्लीन चीट दिली आहे. काही महिन्यापूर्वी त्यांचा अटकपूर्व जामीनही मंजूर करण्यात आला होता. (Pravin Darekar latest news)
२०१५ च्या या आर्थिक प्रकरणात कुठलेही पुरावे न सापडल्याचा अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिला आहे. 'या प्रकरणात इतकी वर्षं तपास सुरू आहे त्यामुळे कस्टडीची गरज नाही,' असं मत हायकोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन देताना नोंदवलं होते. या प्रकरणी अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे आदेशही हायकोर्टाने त्यावेळी दिले होते.
2010 पासून मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावर असलेल्या प्रविण दरेकर यांचा संचालक असण्याचा मार्गही अडवला गेला होता. त्यामुळे ते स्वत: अध्यक्षपदासाठी उभे राहू शकले नव्हते. पण त्यांनी पुढे केलेल्या भाजपच्या प्रसाद लाड यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आणि दरेकरांचं या प्रतिष्ठेच्या बँकेवर असलेलं दशकभराचं वर्चस्व संपुष्टात आलं.
बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अगोदर झाली. पण त्यापूर्वी दरेकर यांच्या संचालकपदावरुन वाद निर्माण झाला होता. दरेकर यांच्या या बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येण्यावरून हा वाद झाला होता.
मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने २७ मार्च २०१५ रोजी प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. बँकेचे अध्यक्ष, संचालक आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी पदांचा दुरुपयोग करून बनावट कागदपत्रे तयार केले. त्याआधारे १२३ कोटींचा घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला होता.
बँकेने नाबार्डची परवानगी न घेता ‘एमपीएसआयडीसी’मध्ये अवैधरित्या ११० कोटींची गुंतवणूक केली. डिझास्टर रिकव्हरी साइटची स्थापना करण्यासाठी एस. एन. टेलिकॉमला बेकायदा निविदा देऊन बँकेचे सहा कोटींहून अधिकचे नुकसान केले. १७२ कोटी रुपये मूल्याचे कर्जरोखे १६५ कोटी ४४ लाखांना विकून बँकेचे सहा कोटी ६० लाखांचे नुकसान केले, असे अनेक आरोप प्रवणी दरेकर आणि संचालकांवर करण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.