Kirit Somaiya : मुंबई 'भोंगेमुक्त' करणार; किरीट सोमय्यांचं पुढचं अभियान ठरलं...

Kirit Somaiya Vows to Make Mumbai Loudspeaker Free BJP Leader Statement in Nanded : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात घुसखोर बांग्लादेशीवरील कारवाईचा आढावा घेतला.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

Kirit Somaiya Bhongemukt Mumbai : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रात घुसखोरी करून राहणाऱ्या रोहिंगे आणि बांग्लादेशींविरोधात मोहीम उघडली आहे. गेली काही दिवस ते याच मुद्यावर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. घुसखोर बांग्लादेशींविरोधात मालेगाव इथली कारवाई राज्यात गाजली.

आता किरीट सोमय्या यांनी पुढचं 'टार्गेट' निश्चित केलं आहे. मुंबई 'भोंगेमुक्त' करण्याचं अभियान हाती घेणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी जाहीर केलं आहे.

भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या नांदेड इथं असताना, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाकडून घुसखोरांविरोधात राबवलेल्या कारवाईचा आढावा घेतला. नांदेडमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरण गाजत आहे. त्याचा पाठपुरावा देखील सुरू असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

Kirit Somaiya
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंची संजय राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकावर पहिली प्रतिक्रिया...

किरीट सोमय्या म्हणाले, "भोंगेमुक्त महाराष्ट्र करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा निर्धार आहे. मुंबई 40% भोंगेमुक्त झाली आहे. पुढील महिन्याभरात मुंबई शंभर टक्के भोंगेमुक्त करणार असल्याची घोषणा केली". बांग्लादेशींनतर आता भोंगेमुक्ती अभियान मी हाती घेतल्याचं किरीट सोमय्या यांनी जाहीर केलं.

Kirit Somaiya
Sharad Pawar NDA entry : शरद पवारांना 'NDA' मध्ये येण्यासाठी रामदास आठवलेंचा अटलबिहारी सरकारचा दाखला!

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आलेल्या बनावट जन्म प्रमाणपत्राची राज्यस्तरावर चौकशी सुरू आहे. यातील सर्व दोषींविरुद्ध कडक कारवाई होईल, असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले. अर्धापूर ग्रामीण रुग्णलयातून तब्बल 82 बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात अजून कुठे, असे बनावट प्रमाणपत्राचे प्रकार झाले आहेत का, याची चौकशी सुरू आहे, असेही सोमय्या यांनी सांगितले.

मुंबईत घुसखोरी करून अवैधरित्या राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात अलीकडच्या काळात पोलिसांनी मोठी कारवाई केली. गेल्या चार महिन्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल 500 पेक्षा जास्त घुसखोर बांग्लादेशी पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. ही कारवाई अधिक तीव्र होणार आहे. भाजपने शिर्डी इथल्या महाविजयी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घुसखोर बांग्लादेशीविरुद्ध युद्ध जाहीर केलं होतं. त्यानुसार राज्यातील महायुती सरकार बांग्लादेशींविरोधात वेगवान कारवाई करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com