Chandrashekhar Bawankule: राजकीय संन्यास घ्या! रोहित पवारांना बावनकुळे असं का म्हणाले?

Rohit Pawar Vs Chandrashekhar Bawankule Political Controversy: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी 'देवाभाऊ' असा उल्लेख असलेली एक जाहिरात सर्वच दैनिकात प्रसिद्ध करण्यात आली होती.यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
Published on
Updated on

‘देवाभाऊ’ हा एकच शब्द असलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीरातीमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी फुलं अर्पण करत असल्याचं फडणवीस या जाहिरातीत दिसत आहेत.

‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणाही ऐकू येतात, ही जाहिरात नेमकी कुणी दिली? हे अद्याप गुलदस्तातच आहे. वर्तमान पत्र आणि दूरचित्रवाणीवर असलेल्या या जाहीरातीवरुन विरोधकांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनीही भाजपवर टीका करतानाच "महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का?" असा प्रश्न मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केला. यावर बावनकुळे यांनीही प्रत्युत्तर देत रोहित पवारांनीफारच मोठा शोध लावल्याचे म्हटले आहे. याबाबत बावनकुळेंनी यांनी टि्वट करीत रोहित पवारांवर टोला लगावला आहे.

हा आरोप सिद्ध करा. अन्यथा, राजकीय संन्यास घ्या.करा सिद्ध , असे थेट आवाहन बावनकुळे यांनी रोहित पवारांना केले आहे. फारच मोठ्ठा शोध लावला तुम्ही.!महसूलमंत्री म्हणून मी कोणत्या कंपनीला ९० कोटींचा दंड माफ केला, हा आरोप सिद्ध करा, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

"तुम्ही रोज ४० कोटी ऐवजी ४०० किंवा ४००० कोटीच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही, पण या जाहिराती निनावी का छापल्या गेल्या? याबद्दल आमचा आक्षेप आहे. कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल. या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर एकीकडं पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना, बिले पेंडिंग राहिल्याने कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का?" असा प्रश्न रोहित पवार यांनी केला होता. त्यावर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Chandrashekhar Bawankule
Uddhav Thackeray: ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई! BMC निवडणूक राज्यातील वातावरणावर मोठा परिणाम करणारी ठरणार

चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात

"रोहित पवार तुम्ही फारच मोठा शोध लावला. महसूलमंत्री म्हणून मी कोणत्या कंपनीला ९० कोटींचा दंड माफ केला, हा आरोप सिद्ध करा. अन्यथा, राजकीय संन्यास घ्या," असे आवाहन बावनकुळे यांनी पवार यांना केले आहे.

रोहित पवारांची सोशल मीडियावर केलेली पोस्ट जशीच्या तशी

"तुम्ही रोज ४० कोटी ऐवजी ४०० किंवा ४००० कोटीच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही, पण या जाहिराती निनावी का छापल्या गेल्या? याबद्दल आमचा आक्षेप आहे. कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल. या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर एकीकडं पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना, बिले पेंडिंग राहिल्याने कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का?"

"या जाहिराती भाजपने दिल्या असतील तर भाजपने आपल्या नावाने जाहिरात का दिली नाही? भाजपने दिली नाही, तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का? तुम्ही महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का? या जाहिरातीच्या प्रकरणात काहीही काळेबेरं किंवा लपवण्यासारखं नसेल तर एवढे कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे आपण जाहीर करा,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com