Nagpur Violence: फडणवीस राबविणार 'योगी पॅटर्न'; नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोजर चालविणार

Nagpur Violence Bulldozer Action Devendra Fadnavis Yogi Pattern :यशोदानगर येथील फहीम खान यांच्या घरावर ही कारवाई करण्यात येणार आहे. नागपूर महापालिकेने त्याला याबाबतची नोटीस दोन दिवसापूर्वी बजावली आहे.
Nagpur Violence:  फडणवीस राबविणार 'योगी पॅटर्न'; नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोजर चालविणार
Published on
Updated on

मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी उत्तर प्रदेशात गुन्हेगारांनी अतिक्रमण केलेल्या जागांवर बुलडोजर कारवाई केली आहे, तोच पर्टन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्र राबवित असल्याचे चित्र आहे. सतिश भोसले उर्फे 'खोक्या'च्या घरावर बुलडोजर कारवाई केल्यानंतर आता नागपूर दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खान याच्या घरावर बुलडोजर चालविण्यास येणार असल्याची माहिती आहे.

फहीम खान यांच्या घराचा काही भाग अतिक्रमणात येत असल्याचे त्यावर कारवाई होणार असल्याची माहिती आहे. नागपूर पोलिसांनी याबाबत तयारी केली आहे. लवकरच त्यांच्या घरावर अतिक्रमण कारवाईत बुलडोजरने त्यांचे घर पाडण्यात येणार असल्याची माहिती आहे. यशोदानगर येथील फहीम खान यांच्या घरावर ही कारवाई करण्यात येणार आहे. नागपूर महापालिकेने त्याला याबाबतची नोटीस दोन दिवसापूर्वी बजावली आहे.

Nagpur Violence:  फडणवीस राबविणार 'योगी पॅटर्न'; नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोजर चालविणार
Pune Zilla Parishad: झेड.पी.च्या आणखी दोन अधिकाऱ्यांचे निंलबन? अधिक्षक अभियंता काय निर्णय घेणार

नागपूर हिंसाचारास जबाबदार असलेल्या आरोपींकून नुकसान भरपाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी दिली आहे. नागपूर हिंसाचारातील अनेक आरोपी शेजारील राज्यात पळून गेल्याची माहिती आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. नागपूर शहरात धार्मिक भावना भडकवून हिंसाचार घडवल्या प्रकरणी फहिम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्याचे घर बुलडोजरने जमीनदोस्त केले जाण्याची शक्यता आहे.

फहीम खान याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.नागपुरात १७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी झालेल्या हिंसाचारात आरोप असणाऱ्या फहीमच्या घरावर बुलडोझर चालणार असल्याची चर्चा नागपूरमध्ये सुरू आहे. यशोधरानगरच्या संजय बाग कॉलनीत राहणारा फहीम खान यांनी घर बांधताना अनधिकृत बांधकाम केल्यानं महापालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे.

फहीम खान याने घराजवळ सुमारे 900 चौरस फुटाचे बांधकाम अनधिकृत बांधकाम केल्यानं महापालिकेने बजावलेल्या नोटीशीमध्ये म्हटलं आहे. फहीम खान याच्या मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीने मालेगाव विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिला होता. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.फहीम खान याच्या चौकशीची मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com