Pune Zilla Parishad: झेड.पी.च्या आणखी दोन अधिकाऱ्यांचे निंलबन? अधिक्षक अभियंता काय निर्णय घेणार

Pune Zilla Parishad officers suspended Anti-corruption action in Pune:कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांना निलंबित करण्याचे अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाला आहेत. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव अधिक्षक अभियंत्यांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
Pune Zilla Parishad
Pune Zilla ParishadSarkarnama
Published on
Updated on

Pune 23 March 2025: बिलं काढण्यासाठी कांत्राटदारांना लाच मागणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तीन लाचखोर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आठ दिवसापूर्वी कारवाई करण्यात आली होती. यातील एकाला निंलबित करण्यात आले आहे तर अन्य दोघांवर निलंबनाची टांगती तलवार आहे.

कार्यकारी अभियंता (दक्षिण विभाग) बाबुराव कृष्णा पवार (वय ५७ वर्षे), उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५७ वर्षे) आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे यांचा समावेश होता. यापैकी कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी निलंबित केले आहे. बाबुराव पवार आणि उपअभियंता दत्तात्रेय पवार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे या दोघांचेही निंलबन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून कंत्राटदाराला त्याच्या झालेल्या कामांची बिलं काढून हवी असतील तर मिळणार असलेल्या एकुण रक्कमेच्या 2 टक्के रक्कम आपल्याला दिली जावी अशी मागणी या तीन अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार या कंत्राटदाराने या तीन अधिकाऱ्यांना 1 लाख 42 हजार रूपये देऊ करत असताना या अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तीनही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

Pune Zilla Parishad
Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूत याच्या CBI रिपोर्टमधील महत्त्वाच्या गोष्टी; चॅटिंगमध्ये काय आढळलं?

कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांना निलंबित करण्याचे अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाला आहेत. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव अधिक्षक अभियंत्यांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. सरकारी सेवेतील कायद्यानुसार कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी २४ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्यास, संबंधिताचे निलंबन करणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेतील तीनही लाचखोर अधिकारी हे तीन दिवसांहून अधिक काळ पोलीस व न्यायालयीन कोठडीत राहिले आहेत.

पोलिसांकडून नागरिकांना अशा प्रकारे लाच मागितली गेली असल्यास एका हेल्पलाईन नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी खालील संपर्क क्रमांक, ईमेल आणि तक्रार अॅप देखील देण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप क्रमांक – 993099770

ई-मेल – dyspacbpune@mahapolice.gov.in

वेबसाईट – www.achmaharashtra.gov.in

तक्रार अॅप – www.achmaharashtra.net.in.

पुणे दुरध्वनी क्रमांक – (020) 26122134, 26132802, 26050423.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com