Shivsena : शिवसेना हादरली ; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच शिवसेना उपप्रमुखांची हत्या ; काही दिवसापूर्वीच जबाबदारी..

Shivsena Thane Deputy Divisional Ravindra Pardeshi Dies : रवींद्र परदेशी असे हत्या झालेल्या शिवसेना उपप्रमुखाचे नाव आहे.
Shivsena Thane Deputy Divisional Ravindra Pardeshi Dies
Shivsena Thane Deputy Divisional Ravindra Pardeshi DiesSarkarnama

Shivsena Thane Deputy Divisional Ravindra Pardeshi Dies :शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसेने उपप्रमुखांची हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच ही हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या या व्यक्तीवर काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी उपप्रमुखपदाची जबाबदारी दिली होती.

उपप्रमुखाची जबाबदारी मिळाल्यानंतर काही दिवसातच त्यांची हत्या झाल्याने शिवसेनाचा मोठा धक्का बसला आहे.ठाणे परिसरात खळबळ उडाली आहे. रवींद्र परदेशी (वय ४८, रा.खारकर आळी, ठाणे ) असे हत्या झालेल्या शिवसेना उपप्रमुखाचे नाव आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली.

Shivsena Thane Deputy Divisional Ravindra Pardeshi Dies
Maharashtra Budget 2023 : ठाकरे अन् त्यांच्या पत्नीचं पटत नाही, असं राऊतांनी..; राणेंचा गौप्यस्फोट

परदेशी हे जांभळी नाका येथील शिवेसनेचे उपविभाग प्रमुख होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच त्यांच्यावर ही जबाबदारी दिली होती. परदेशी यांच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. परदेशी यांची मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तीक्ष्ण हत्यारांनी हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आला होता.

Shivsena Thane Deputy Divisional Ravindra Pardeshi Dies
Gulabrao Patil On Sanjay Raut: विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणारी ही कुणाची औलाद ? ; गुलाबराव पाटील राऊतांवर भडकले...

घरी जात असताना त्यांच्यावर अज्ञान व्यक्तींनी हल्ला केला. फेरीवाल्यांच्या वादातून टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जखमी अवस्थेत परदेशी यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणे नगर पोलीस करीत आहेत.

ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत रवींद्र परदेशी यांचा कटलरीचा व्यवसाय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातच शिवसेना उपप्रमुखांची हत्या झाल्याने राज्यातील कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचे ठाण्यातील नागरिकांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com