Pune News : मुख्यमंत्री शिंदे पुण्याच्या 'या' प्रश्नात लक्ष घालणार..

Pune News : नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील समस्यांबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भानगिरे यांनी दिले आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde sarkarnama

Pune News : पुणे शहरात सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट झाला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात, पण त्याला यश येत नाही, याबाबत ठोस उपाययोजना राबविण्यात याव्यात , यासाठी बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली.

येत्या काही दिवसांत पुणे महापालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना गटाचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांनी दिली.

"महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले आहे. या प्रश्नाबाबत शिंदे हे येत्या काही दिवसांत महापालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहेत. त्यांच्या बैठकीनंतर पुण्यातील वाहतूक कोंडी, पाणीपुरवठ्याससह काही प्रश्न मार्गी लागतील," असे भानगिरे यांनी सांगितले. महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील समस्यांबाबतचे निवेदन एकनाथ शिंदे यांना भानगिरे यांनी दिले आहे.

CM Eknath Shinde
Udayanraje Bhosale : मोदींच्या भेटीनंतर उदयनराजे म्हणाले, "कोश्यारींच्या कारवाईवर मोदी गांर्भीयाने.."

पुण्याच्या सर्व भागाला समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात बाबत उपायोयजना, निवासी मिळकतींना चाळीस टक्के कर सवलत पुन्हा सुरू करण्यासंदर्भातील प्रलंबित निर्णयाबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबतची मागणी भानगिरे यांनी निवेदनात केली आहे.

CM Eknath Shinde
Chhatrapati Sambhaji Raje : शिंदे-फडणवीस, बिळातून बाहेर या, सांगा हे राज्यपाल नकोत ; संभाजीराजे संतापले

प्रमोद भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे...

  • पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची तातडीने अंमलबजावणी करा

  • सय्यदनगर हांडेवाडी येथे भुयारी मार्ग करा,

  • शहराच्या वाढीव पाणीकोट्याबाबत तातडीने निर्णय घ्या

  • पुण्यासाठी मुळशी धरणातून पाच अब्ज घनफूट पाणी उपलब्ध व्हावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com