Thackeray Group: चार भिंतीच्या आड तरी CM पदाचा चेहरा ठरवा; ठाकरे गटाचा आग्रह

Thackeray group statement on maha vikas aghadi: ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा,त्याचा मुख्यमंत्री..हे सूत्र मान्य नसल्याचे उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच जाहीरपणे म्हटले आहे. या सुत्रामुळे एकमेकांच्या जागा पाडल्या जातील, अशी भितीही ठाकरे यांनी व्यक्त केली होती.
Thackeray group statement on maha vikas aghadi
Thackeray group statement on maha vikas aghadiSarkarnama
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा, असा आग्रह महाविकास आघाडीतील काही नेते करीत असले तरी अद्याप यावर ठाकरे गट (Thackeray group) वगळता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसने ठोस उत्तर दिलेले नाही.

विधानसभा निवडणुकीपूर्वी किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली असल्याची सुत्रांची माहिती आहे.

महाविकास आघाडीचा नुकताच मेळावा झाला. मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करीत त्या चेहऱ्याला आपला पाठिंबा दर्शवला होता. परंतु यावर काँग्रेस आणि शरद पवार गटाने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा, अशी चर्चा ठाकरे गटात सुरु झाली आहे.

ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा,त्याचा मुख्यमंत्री..हे सूत्र मान्य नसल्याचे उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच जाहीरपणे स्पष्ट केले आहे. या सुत्रामुळे एकमेकांच्या जागा पाडल्या जातील, अशी भितीही ठाकरे यांनी व्यक्त केली होती.

महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या हालचाली सुरु आहेत. मुख्यमंत्रीपदी कोण, याविषयी तीनही घटक पक्षात इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमत झाले असले तरी या पदावरुन घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

आघाडीची सत्ता आल्यास कोण मुख्यमंत्री होईल, या प्रश्नांचे उत्तर आघाडीच्या नेत्यांनी स्पष्टपणे दिलेले नाही. आघाडीच्या मेळाव्यात व्यासपीठावर शरद पवार आणि नाना पटोले उपस्थित असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवा, मी त्याला पाठिंबा देतो, असे ठाकरे यांनी सांगितले. पण यावर पवार आणि पटोले यांनी कुठलेही भाष्य केले नाही.

Thackeray group statement on maha vikas aghadi
Badlapur Rape Case: खोट कसं बोलावं,हे मुख्यमंत्र्यांकडून शिकावं; बदलापूर प्रकरणावरुन अरविंद सावंतांचा टोला

ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी केले होते. चव्हाणांच्या विधानाचा धागा पकडून शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत महत्वाचे विधान केले आहे.मुख्यमंत्रिपदाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेली भूमिका दुर्लक्ष करण्याजोगी नाही, असे पवार म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com