Badlapur Rape Case: खोट कसं बोलावं,हे मुख्यमंत्र्यांकडून शिकावं; बदलापूर प्रकरणावरुन अरविंद सावंतांचा टोला

MP Arvind Sawant on Eknath Shinde: दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी एका भाषणात केले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Badlapur Rape Case
Badlapur Rape CaseSarkarnama
Published on
Updated on

Badlapur School Case : बदलापूरच्या घटनेचा राज्यभर निषेध होत असतानाच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ठाकरे गटाकडून अनेक ठिकाणी जन आक्रोश आंदोलनं केली जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बदलापूर आंदोलनाबाबत विरोधकांवर संशय व्यक्त केला होता. त्यावर खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे.

कसं खोट बोलावं, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिकावं, असा टोला अरविंद सावंत यांना लगावला. खोटारड्यांचा महाराष्ट्र, भष्ट्राचाऱ्यांच्या महाराष्ट्राचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री शिंदे किती खोटं बोलतात, हे राज्यातील जनतेने पाहावं, असे सावंत म्हणाले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

बदलापूरचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीत होते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनाबाबत विरोधकांवर संशय व्यक्त केला आहे. चार महिन्यापूर्वी महाराष्ट्रात एका आरोपीने बलात्कार केला होता.

आम्ही फास्टट्रॅक खटला चालवला. दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी एका भाषणात केले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

बदलापूरची घटना महाराष्ट्राला, सरकारला कलंकित करणारी आहे. जरा तरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा. इतकं नीच घाणेरडे विकृत प्रकरण महाराष्ट्रात घडतं त्याचं तुम्ही राजकारण करता, अशा शब्दात अरविंद सावंत यांनी फटकारले आहे.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणात स्युमोटो याचिका दाखल करुन घेतली होती. या याचिकेवर आज तातडीची सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने सत्ताधारी शिंदे सरकारला झापले.

गुन्हा लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पोलीस आणि राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं हे खेदजनक आहे, अशा शब्दांत न्यायालयाने राज्य सरकारला खडसावलं.

Badlapur Rape Case
Pune Porsche Accident Case: पोलिसांनी न्यायालयात सादर केली 'एका गुन्ह्याची गोष्ट': दोषारोपपत्रात पाचशे फोटोंचा 'अल्बम'

बदलापूर प्रकरणावर काय म्हणाले होते मुख्यमंत्री

रत्नागिरीत (Ratnagiri) झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "बदलापूर घटनेचं राजकारण केलं जात आहे.चार महिन्यांपूर्वी अशीच एक घटना घडली. त्यावेळी प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवलं गेलं. आणि दोन महिन्यांत या आरोपीला फाशीची शिक्षा झाली..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com