मुख्यमंत्री शिंदेंचे 'ओएसडी' डॉ. राहुल गेठे अपघातात जखमी आजी-आजोबांच्या मदतीला धावले; हॉस्पिटललाही नेले...

Dr. Rahul Gethe News : डॉ. राहुल गेठे अपघातात जखमी आजी-आजोबांच्या मदतीला धावले
Dr. Rahul Gethe News
Dr. Rahul Gethe NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai-Pune Expressway News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर (Mumbai-Pune Expressway) भीषण अपघात झाला... या जीवघेण्या अपघात नेमके आजी-आजोबा कारमध्ये अडकले...ते जिवाच्या आकांताने ओरडत राहिले... पण कार धडकलेल्या लोखंडी कठड्याचा भलामोठा पत्राच कारमध्ये खुसल्याने आजी-आजोबांना बाहेर काढणे अवघड होते.

मदतीसाठी कोणी थांबत नव्हते... तेवढ्यात मुंबईहून (Mumbai) पुण्याकडे निघालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde)'ओसएसडी डॉ. राहुल गेठे रस्त्यावर थांबले. फोनाफोनी करून पोलिस आणि अन्य यंत्रणेला काही मिनिटांत आणले. अखेर कारची दारे कापून पाच मिनिटे आजी-आजोबांना कारमधून काढून; डॉक्टर असलेल्या गेठेंनी आजी-आजोबांना किमान उपचार देऊन धीर दिला आणि डॉ. ची तत्परता आणि धाडसामुळे आजी, आजोबा आणि त्यांच्या मुलाचाही जीव वाचला.

Dr. Rahul Gethe News
Chinchwad By Election : ठरलं तर ! अश्विनी जगतापांना लाखांच्या मताधिक्यानं भाजप निवडून आणणार

दौऱ्यात असलेल्या मुख्यमंत्री शिंदेंनी तिघांवर मोफत उपचाराचा आदेशही दिला. घटना अशी घडली... मुंबई-पुणे (Pune) एक्स्प्रेसवर मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या कारला शनिवारी दुपारी सव्वातीन सोमाटणे फाट्याजवळ अपघात झाला. हा अपघात भीषण होता; सुसाट आलेली कार रस्त्यालगतच्या लोखंडी दुभाजकावर आदळली आणि दुजाकाचा भलामोठा पत्रा काचेतून मागील बाजुला बसलेल्या आजी-आजोबांपर्यंत पोचला.

कार 'लॉक' झाली. कारचा ड्रायव्हर बाहेर फेकला गेला. आजी-आजोबा आरडाओरड करू लागले; पण काही केल्या मदत मिळाली नाही. तेवड्यात डॉ. गेठेंनी अपघात पहिला आणि आपली गाडी थांबवून थेट आजी-आजोबांना बाहेर काढण्यासाठी धावले. तरीही, त्यांना बाहेर काढणे शक्य होत नव्हते...शेवटी आपत्कालीन यंत्रणा बोलावून कारचे दरवाजे कापून आजी-आजोबांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

भीषण अपघाताने प्रचंड घाबरलेल्या आजी-आजोबांना डॉ. गेठेंनीच जागेवर उपचार केले. त्यानंतर अॅम्ब्युलन्समधून तिघांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. या तिघांवर तातडीने आणि योग्य उपचार होतील, यासाठी संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनासोबत चर्चा केली. त्यानंतरच डॉ. निघून आले.

Dr. Rahul Gethe News
Satyajit Tambe News : सत्यजीत तांबेंचे पटोलेंवर आरोप; 'थोरातांनी आता बोललं पाहिजे : 'काय घडले हे फक्त...'

डॉ. राहुल गेठे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) आहेत. गोठे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू मानले जातात. मुख्यमंत्री कार्यालयातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहे. शिवाय, ते डॉक्टर आहेत. त्यामुळे अपघात अडकलेल्या आजी-आजोबांवर उपचार करण्यापासून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेमके काय उपचार करायचे, हे त्यांना लगेचच सांगता आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com