Chinchwad By Election : ठरलं तर ! अश्विनी जगतापांना लाखांच्या मताधिक्यानं भाजप निवडून आणणार

Ashwini Jagtap News : चिंचवडची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरु असताना ती लढण्याचीही जोरदार तयारी...
Ashwini Jagtap News
Ashwini Jagtap NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी या मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्या सोमवारी( दि.६) दुपारी एक वाजता मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पण,तत्पूर्वीच त्यांनी पिंपरी-चिंचवडचे ग्रामदैवत मोरया गोसावीचे दर्शन घेऊन प्रचारालाही धुमधडाक्यात सुरुवात केली आहे.

सकाळीच अश्विनी जगताप या चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिरात गेल्या. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रचारास सुरवात केली. यावेळी शहर भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य आणि प्रमुख आजी,माजी पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. तेथून त्या संघ कार्यालयात गेल्या. संघ कार्यावह ज्ञानेश्वर मराठे यांची व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. धर्मजागरण प्रमुखांसह इतर मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या.

Ashwini Jagtap News
Devendra Fadnavis On Raut : '' सकाळी 9 वाजता टीव्ही लावला की...''; फडणवीसांचा राऊतांना मिश्किल टोला

अश्विनी जगताप या उद्या (दि.६) दुपारी एक वाजता हजारोंच्या उपस्थितीत मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी पिंपळे गुरव येथील निवासस्थान ते थेरगावच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढणार आहेत.

त्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मावळचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधानपरिषद सदस्या उमा खापरे,भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप आदी सहभागी होणार आहेत.

चिंचवड पोटनिवडणूक लक्षवेधी ठरावी यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे अशी माहिती शंकर जगताप यांनी दिली. त्याअगोदर बावनकुळे,पाटील व महाजन हे पुण्यात कसबापेठच्या पोटनिव़डणुकीतील पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज असाच मोठे शक्तीप्रदर्शन करून सकाळी ११ वाजता भरणार आहेत.

Ashwini Jagtap News
MNS News : मनसेनं करुन दिली शरद पवारांच्या 'त्या' जुन्या Videoची आठवण..

लाखांच्या लीडने जगतापांना निवडून आणण्याचा भाजपचा निर्धार...

चिंचवडची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न एकीकडे भाजपकडून सुरु असताना ती लढण्याचीही जोरदार तयारी त्यांनी सुरु केल्याचे दिसून आले आहे.अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांची उमेदवारी जाहीर होताच पक्षाचे सर्व माजी नगरसवेक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कालच बैठक झाली.त्यात एक लाखांहून अधिक मताधिक्यांनी आपला उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, संदीप खर्डेकर आदी यावेळी उपस्थित होते.या बैठकीला मंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकण्यासाठी सर्वांनी आजपासूनच कामाला सुरूवात करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com