अजितदादा, जिथे तुम्ही आहात, तिथे मला येण्याची गरज नाही!

आम्ही नुसते कष्ट करत आहोत, पण तरीही ते बदनामी करीत आहेत.
Ajit Pawar, Uddhav Thackeray
Ajit Pawar, Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''अजितदादा जिथे तुम्ही स्वतः आहात तिथे मला येण्याची गरज नाही कारण आपण एकत्र आहोत,'' असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्या कामाचं कैातुक केलं.

राज्य सरकारच्या नवीन जीएसटी भवनाचे (GST Bhavan) भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलते होते. यावेळी अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ''कर संकलनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्रचा वाटा मोठा आहे. जे बजबजपुरी करीत आहेत, त्यांना सांगू इच्छितो कि महाराष्ट्राला धक्का लागलंय तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेला धक्का लागेल. आम्ही नुसते कष्ट करत आहोत, पण तरीही ते बदनामी करीत आहेत. पण त्या बदनामीला छेद देऊन आम्ही काम करू,''

''जीएसटी भवन असं करू कि ते पाहायला लोक आलं पाहिजे. ज्यावेळी आपण जीएसटी विभागाचे कौतुक करतोय त्या करदात्याला समाधान वाटलं पाहिजे, जे अधिकारी चांगल काम करतात त्यांचे कौतुक आणि प्रशिक्षण करणार आहोत. महाविकास आघाडी सरकारमधील सर्व घटक एकजुटीने काम करीत आहेत, '' असे मुख्यमंत्री म्हणाले.

Ajit Pawar, Uddhav Thackeray
आमच्यात रुसवे फुगवे नाहीत ; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं!

उद्धव ठाकरे म्हणाले, ''एक वातावरण तयार केल जातंय कि महाविकास आघाडी सरकारमध्ये रुसवे फुगवे आहेत. पण या सरकारचे नाव महाविकास आघाडी असं आहे. कोणतेही रुसवे फुगवे नाहीत. आजच्या जीएसटी भवनाचे श्रेय मी अजितदादांना देतो. त्यांनी जे काय संकल्पचित्र दाखवले ते अप्रतिम आहे. आजचा भूमिपूजन फक्त नारळ फोडायला नाही आहे, तर प्रत्यक्ष कामाला सुरवात आहे. काहींना सरकार पाडण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही. कामाची गुढी ते उभारू शकत नाहीत,''

Ajit Pawar, Uddhav Thackeray
देशमुख-वाझेंना सीबीआय घेणार ताब्यात ; अडचणी वाढणार!

कालच (31 मार्च) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. याच बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांवर काँग्रेसच्या मंत्र्यांनी नाराजी बोलून दाखवल्याची जोरदार चर्चा होती. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात काँग्रेस मंत्री अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांनी हातात तलवार घेऊन फोटो काढल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचे पडसाद बैठकीत उमटले असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com