आमच्यात रुसवे फुगवे नाहीत ; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं!

काहींना सरकार पाडण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही. कामाची गुढी ते उभारू शकत नाहीत
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्य सरकारच्या नवीन जीएसटी भवनाचे (GST Bhavan)भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सध्या सुरु आहे, त्याला मुख्यमंत्र्यांनी आजच्या कार्यक्रमात उत्तर दिलं

अजित पवार म्हणाले, ''आजचा गुढी पाडवा हा कोरोना मुक्तीची नवी पहाट घेऊन आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व निर्बंध हटवले त्यासाठी त्यांचे आभार. जीएसटी भवन व्हावं, अशी २०१४ पूर्वीपासूनची इच्छा होती पण काहीना काही अडचणी आल्या. मात्र आज याचे भूमिपूजन होत आहे. साधारण यात 1800 कोटी रुपयाची ही इमारत असून ती 'ग्रीन बिल्डिंग' असेल, यासाठी जो निधी लागेल तो राज्य सरकारकडून दिली जाईल. वेळेत काम पूर्ण झाले पाहिजे,''

''जे जे टॅक्स मिळवून देणारे विभाग आहेत, त्या ठिकाणी सर्व सुविधा असल्या पाहिजेत. जनतेला चांगली सेवा देता आली पाहिजे. आम्ही कोरोना विरुद्ध यशस्वी काम केले आहे,'' असे पवार म्हणाले.

Uddhav Thackeray
देशमुख-वाझेंना सीबीआय घेणार ताब्यात ; अडचणी वाढणार!

अजित पवार म्हणाले, ''यंदाचा अर्थसंकल्प आपण 1 कोटी ट्रिलियनवर नेऊन ठेवायचा आहे. आपण ते उद्दिष्ट पूर्ण करू या. यंदाचा अर्थसंकल्पामध्ये एक सुद्धा रुपयाची करवाढ आपण केली नाही. एक एप्रिलपासून नैसर्गिक वायूंचा कर आपण कमी केला. त्यामुळे पाईप लाईनने गॅस पुरवठा होणाऱ्या लाखो घरांमध्ये फायदा होणार आहे,''

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ''एक वातावरण तयार केल जातयं कि महाविकास आघाडी सरकारमध्ये रुसवे फुगवे आहेत. पण या सरकारचे नाव महाविकास आघाडी असं आहे. कोणतेही रुसवे फुगवे नाहीत. आजच्या जीएसटी भवनाचे श्रेय मी अजितदादांना देतो. त्यांनी जे काय संकल्पचित्र दाखवले ते अप्रतिम आहे.

Uddhav Thackeray
Aryan Khan:साठ दिवसात आरोपपत्र दाखल करा ; NCBला न्यायालयाने सुनावले

आजचा भूमिपूजन फक्त नारळ फोडायला नाही आहे तर प्रत्यक्ष कामाला सुरवात आहे. काहींना सरकार पाडण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही. कामाची गुढी ते उभारू शकत नाहीत,''

कालच (31 मार्च) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. याच बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांवर काँग्रेसच्या मंत्र्यांनी नाराजी बोलून दाखवल्याची जोरदार चर्चा होती. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात काँग्रेस मंत्री अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांनी हातात तलवार घेऊन फोटो काढल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचे पडसाद बैठकीत उमटले असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com