आम्ही कधीतरी शिष्टमंडळ घेऊन यायचो, रोज नाही ; राजभवनात मुख्यमंत्र्यांचा टोला

राजकीय हवा कशी ही असू द्या, इथली हवा ही थंड असते.
uddhav thackeray, Ram Nath Kovind
uddhav thackeray, Ram Nath Kovindsarkarnama

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारबाबत तक्रारी करण्यासाठी विरोधकांच्या राजभवनावर फेऱ्या वाढल्या आहेत. अनेक विषयावर भाजपचे शिष्टमंडळ हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी जात असतात. यावरुन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांनी विरोधकांना टोला लगावला. राजभवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind)यांच्या हस्ते दरबार हॉलचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

''राजकीय हवा कशी ही असू द्या, इथली हवा ही थंड असते. आम्ही जेव्हा विरोधात होतो त्यावेळी कधीतरी शिष्टमंडळ घेऊन आम्हीही राजभवनावर यायचो. रोज रोज येत नव्हतो,'' असा टोमणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ''आधुनिकीकरणाच्या नावाखाली सर्व तोडून मोडून टाकलं जातं मात्र इथे जपलेलं आहे. या नवीन वास्तुमध्ये आनंददायी घटना घडाव्यात अशी अपेक्षा आहे. दरबार हॉलचे अप्रतिम असं सौंदर्य नव्या दमाने लोकांसमोर ठेवले आहे. मुंबईतील राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन आहे. एका बाजूला अथांग समुद्र दुसऱ्या बाजूला सुंदर झाडं, ज्याला शहरातील जंगल असं देखील म्हणता येईल. याने हे राजभवन अधिकच सुंदर झाले आहे. पावसाळ्यात थुई थुई नाचणारे मोर आहेत. अशी वास्तू शोधून सापडणार नाही,''

राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला असून त्याची आसन क्षमता 750 इतकी आहे. जुन्या हॉलची आसन क्षमता 225 इतकी होती.

असा आहे राजभवनातील दरबार हॉल

  • इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या 1911 साली झालेल्या भारत भेटीच्या वेळी दरबार हॉल बांधण्यात आला होता.

  • नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला आहे.

  • त्याची वास्तू रचना तत्कालीन वास्तू रचनाकार जॉर्ज विटेंट यांची होती.

  • अधिक काळ लाटा व वादळ-वाऱ्यांचे तडाखे सहन केल्यामुळे पूर्वीचा दरबार हॉल अतिशय जीर्ण झाला होता.

  • 2016 नंतर त्याचा वापर थांबविण्यात व कालांतराने त्याजागी नवा अधिक क्षमतेचा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय झाला.

  • नव्या दरबार हॉलचे बांधकाम 2019 साली सुरु झाले.

  • कोविडमुळे बांधकामाची गती मंदावली.

  • कालांतराने बांधकाम पुनश्च सुरु झाले.

  • डिसेंबर 2021 मध्ये हॉल बांधून पूर्ण झाला.

  • ५० एकरात हे राजभवन आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com