Devendra Fadnavis News : '' तो माझा आनंद फार काळ टिकला नाही, कारण पक्षानं मला...''; फडणवीसांची कबुली

Maharashtra Politics : '' एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा हा प्रस्ताव मीच दिला होता...''
Eknath Shinde -Devendra Fadnavis
Eknath Shinde -Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : ठाकरेंचे सरकार पाडून, तेव्हाच्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंना फूस लावून, शिंदे-फडणवीसांचे सरकार उभारलेल्या; मात्र, या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद वाट्याला आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पदाच्या वाटाघाटी आणि स्व:पक्षाच्या नेत्यांच्या निर्णयावरून पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलले.

जेव्हा माझ्या पत्रकार परिषदेत ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर चिंता नाही तर उलट माझ्या चेहऱ्यावर विजयीभाव होते.पण हा माझा आनंद फार काळ टिकला नाही. कारण घरी आल्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी फोन करून उपमुख्यमंत्री व्हायला सांगितले आणि हा माझ्यासाठी मोठा धक्का होता अशी एकप्रकारची कबुलीच फडणवीसांनी दिली.

Eknath Shinde -Devendra Fadnavis
Devendra Fadnavis News : निधीवाटपात देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांवर 'भरवसा'

राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये पक्षानं उपमुख्यमंत्री व्हायला लावलं हा माझ्यासाठी मोठा धक्का होता असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केलं आहे. ते एका वृत्तवाहिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहे.

फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा हा प्रस्ताव मीच दिला होता. माझ्या पत्रकार परिषदेत ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर चिंता, क्षोभ नव्हते. तर उलट माझा चेहरा विजयी होता. मला एक जिंकल्याचा आनंद होता. मात्र, तो माझा आनंद फार काळ टिकला नाही. कारण घरी आल्यानंतर माझ्या पक्षाने मला फोन करून उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं. आणि हा माझ्यासाठी मोठा धक्का होता.

Eknath Shinde -Devendra Fadnavis
Sunday Special : खासदार श्रीनिवास पाटलांच्या नातवानं आजोबांचं नाव काढलं; पटकावला 'हा' मानाचा पुरस्कार

फडणवीस नेमकं काय म्हणाले....?

मुख्यमंत्रीपदावरुन उपमुख्यमंत्री होतोय किंवा खालच्या पदावर जातोय याचं दु:खं मला नव्हतं.माझ्या पक्षाने सांगितलं तर मी चपरासी व्हायलाही तयार आहे. मला चिंता याप्रकारची होती, आपण ज्या प्रकारचं राजकारण करतो; त्यानंतर लोकं काय म्हणतील, सत्तेसाठी किती हापापलेला आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री होता, आता सत्तेसाठी उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाला. मी मुख्यमंत्री होणार नाही, हे मी ठरवलं असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

'' माझ्या पक्षाला कन्व्हिन्स करायला...''

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aaghadi Government)आपल्या विचाराने चालू शकेल असं शिवसेनेच्या आमदारांना वाटलं. हिंदुत्वादी विचारांच्या लोकांचा जीव सरकारमध्ये, पक्षात गुदमरतोय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी एकनाथ शिंदेंसोबत माझं बोलणं झालं. त्यानंतर मी पक्षाकडे गेलो आणि आता आपण सरकार बदललं पाहिजे असा प्रस्ताव मांडला.

त्यावेळी शिंदेंना मुख्यमंत्री केले पाहिजे असेही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले. माझ्या पक्षाला माझ्या मतात कन्व्हिन्स करायला बराच वेळ गेला. पण मी पक्षाला सांगितलं, जर एकनाथ शिंदे (Eknath Shinde)एवढं मोठे पाऊल उचलत आहेत तर त्यांना आपण मुख्यमंत्री केलं पाहिजे. तरच त्यांना आत्मविश्वास येईल असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com