मलिक-वानखेडे संघर्ष पण गृहमंत्री वळसे पाटील यांना राहावे लागणार लांब

क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला दररोज वेगळं वळण लागत आहे.
Dilip Walse Patil in Quarantine
Dilip Walse Patil in Quarantine
Published on
Updated on

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला दररोज वेगळं वळण लागत आहे. या प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण (एनसीबी) विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यातील संघर्ष वाढला आहे. वानखेडे यांची चौकशी सुरू असून त्यांनी अटकेच्या संरक्षणासाठी न्यायालयातही धाव घेतली आहे. पण त्यानंतरही मलिकांचे आरोप थांबलेला नाही. हा संघर्ष वाढत चाललेला असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) क्वारंटाईन झाले आहेत.

दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे पाटील यांना याच वर्षात दोनदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या आठवड्यात ते नागपूर-अमरावतीच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर गुरूवारी सकाळी ट्वीट करुन त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे पाटील यांना किमान चौदा दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यांना कोणत्याही ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थितीत राहता येणार नाही. मात्र, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा मोबाईलच्या माध्यमातून ते संपर्कात राहू शकतात.

Dilip Walse Patil in Quarantine
आर्यनला अटक ते जामीन अन् बहीण सुहानाचे केवळ तीनच शब्द...

नवाब मलिक यांच्याकडून वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात आता राज्य सरकारनंही उडी घेतली आहे. वानखेडे यांच्याविषयी करण्यात आलेल्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांची एक टीम सक्रीय झाली आहे. तर वानखेडे यांनी अटक टाळण्यासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांना न्यायालयानं दिलासाही दिला आहे. पण मलिकांकडून केले जाणारे आरोप थांबलेले नाहीत. दोघांमधील संघर्ष दिवसागणिक वाढत चालला आहे.

Dilip Walse Patil in Quarantine
हिवाळी अधिवेशनात मलिक टाकणार भाजप नेत्यांवर बॉम्ब

मलिक यांच्याकडून आरोप होत असताना महाराष्ट्र पोलिसांकडून म्हणावी तशी त्याची दखल घेतली जात नसल्याचे जाणकार सांगत आहेत. वानखेडे यांची चौकशी एनसीबीकडूनच केली जात आहे. अद्याप पोलिसांकडून त्यांना चौकशीसाठी बोलावणे आलेले नाही. राज्याच्या गृह विभागाकडून तातडीने हस्तक्षेप करून कारवाईसाठी पावले उचलावीत, अशी मलिकांची अपेक्षा आहे. मलिकांनी आता भाजप नेत्यांवरही थेट आरोप केले असून पुढील काही दिवसांत ते आणखी खुलासे करणार आहेत.

त्यामुळे राज्याच्या गृह विभागालाही सतर्क राहून याबाबत भूमिका घ्यावी लागणार आहे. पण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची दिवाळीही क्वारंटाईनमध्ये जाणार आहे. दिवाळीनंतरच ते सक्रीय होऊ शकतात. त्यामुळे गृह विभागाच्या हालचाली मंदावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात सुरू असलेल्या या घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्याप उघडपणे आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com