Mumbai : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाठीभेटीनंतर मित्रपक्षांकडून सावध पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस वगळून शिवसेना आणि काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर शिवसेना आणि काँग्रेसकडून लोकसभेच्या ४८ मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज मुंबईत बैठक होत आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीच्या काही मतदारसंघावर दावा केला आहे, त्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. (Congress core committee meeting in Mumbai today)
बीकेसीमधील एमसीए क्लबमध्ये काँग्रेसच्या प्रमुख पधाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात येत आहे. त्याचबरोबर लोकसभा मतदारसंघाचा घेण्यात आलेला आढावा याबाबतचा अहवालही या बैठकीत मांडला जणार आहे. या अहवालात अनेक मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या अनेक मतदारसंघावर दावा करण्यात आलेला आहे. त्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, पवार काका-पुतण्याची भेट, राष्ट्रवादीची वाटचाल यामुळे त्यांनी ऐनवेळी निर्णय घेतला अडचण नको म्हणून काँग्रेसने सर्व ४८ मतदासंघाचा आढावा घेतला आहे. स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भेटीत काय चर्चा झाली, याचीही माहिती या कोअर कमिटीला देण्यात येईल. त्यावर सविस्तर चर्चा होईल.
इंडिया आघाडीची पुढची बैठक ही मुंबईत ता. ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षावर या बैठकीच्या नियोजनाची जबाबदारी आहे. त्याच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. पक्षातील कोणत्या नेत्याला कोणती जबाबदारी द्यायची याचीही चर्चा होणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची या वेळी उपस्थित राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.