Sapkal Vs Kokate : कृषीमंत्री कोकाटेंचे डोके ठिकाणावर आहे का? हर्षवर्धन सपकाळ संतापले; म्हणाले, 'तर काँग्रेस...'

Manikrao Kokate Harshavardhan Sapkal : केंद्रातील भाजपा सरकार शेतमालाच्या हमी भावात वाढ करून शेतकऱ्यावर उपकार केल्याचा अविर्भाव आणत आहे. परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
Harshavardhan Sapkal launches a scathing attack on Agriculture Minister Manikrao Kokate over farmer-related issues.
Harshavardhan Sapkal launches a scathing attack on Agriculture Minister Manikrao Kokate over farmer-related issues.sarkarnama
Published on
Updated on

Congress Politics : आपल्या वादग्रस्त विधानाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सतत चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी सिन्नर तालुक्यात पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना काढलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करायचे ? ढेकळाचे पंचनामे करायचे का? असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर टीका होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट कोकाटेंना इशाराच दिला आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने वायफळ बडबड करुन शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. आधी या मंत्र्याने शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली, कर्जमाफीतून शेतकरी मुलींची लग्ने करतात, साखरपुडे करतात अशी मुक्ताफळे उधळली आता त्यांनी ढेकळाचे पंचनामे करू का? असा उद्धट प्रश्न केला आहे. या कृषी मंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल सपकाळ यांनी केला.

कोकाटे यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी योग्य समज द्यावी अन्यथा काँग्रेस व शेतकरीच त्यांना योग्य ती समज देतील, असा इशारा देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. हमी भावावरून देखील एमएसपीमधील ही किरकोळ वाढ म्हणजे राजा उदार झाला दिला आणि हाती भोपळा दिला अशीच आहे, असा हल्लाबोल देखील सपकाळ यांनी सरकारवर केला.

Harshavardhan Sapkal launches a scathing attack on Agriculture Minister Manikrao Kokate over farmer-related issues.
Maharashtra Politics : निवडणुकीच्या आधीच ठाकरेंची शिवसेना-मनसे एकत्र? 'या' आंदोलनातून मनोमिलन!

केंद्रातील भाजपा सरकार शेतमालाच्या हमी भावात वाढ करून शेतकऱ्यावर उपकार केल्याचा अविर्भाव आणत आहे. परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी असून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. काँग्रेसप्रणित डॉ. मनमोहनसिंह सरकारने 2004 ते 2014 या 10 वर्षात हमीभावात 120 ते 150 टक्के वाढ दिली तर 2014 ते 2024 काळात मोदी सरकारने या तुलनेत केवळ 45 टक्केच वाढ केली आहे, असे सपकाळ म्हणाले.

तीन जूनपासून आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ११ वर्षात दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्यामंध्ये वाढ होत आहे, दररोज ६ शेतकरी आत्महत्या होत आहेत. मोदींनी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस पक्ष ३ जून रोजी यवतमाळमधील दाभडी गावात ‘क्या हुआ तेरा वादा’? असा प्रश्न विचारत पदयात्रा काढणार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Harshavardhan Sapkal launches a scathing attack on Agriculture Minister Manikrao Kokate over farmer-related issues.
Pawar Vs Padalkar : रोहित पवार-गोपीचंद पडळकर आमने-सामने; तणाव अन् सत्कार..., मध्यरात्री काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com