Ashok Chavan News : 'हमारे पास उद्धव ठाकरे, अजितदादा और पटोले है!' चव्हाणांची जोरदार फटकेबाजी

Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडी एकत्र असली तर इतिहास घडतो
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama

Ashok Chavan mumbai BKC News : आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत. बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या. तीन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर इतिहास घडतो, असे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

महाविकास आघाडीची मुंबईतील बिकेसी मैदानावर वज्रमूठ सभा होत आहे. या सभेमध्ये अशोक चव्हाण यांनी भाजपवर हल्लाबोल केला. आगामी काळात आपल्याला सिक्सर मारायचा आहे. मुंबई महापालिका सुद्दा जिंकणारच आहोत. महापालिका, लोकसभा आणि विधानसभा आपल्याला जिंकायच्या आहेत. पुढील काळात संधीसाधू आणि आयाराम गयारामला लोक थारा देणार नाहीत. हमारे पास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अजितदादा और नाना पटोले है!, असे अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.

Ashok Chavan
Aditya Thackeray : आमच्याकडे खुर्च्या रिकाम्या राहत नाहीत...आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं

इंजिनची गरज काय आहे, आपले इंजिन ताकदवर आहे. ज्यांचे इंजिनमध्ये ताकद नसते त्यांना तीन-तीन इंजिनची गरज लागते. आपले एकच इंजन ताकदवर आहे. त्यामुळे इतर इंजिंनची गरज पडणार नाही. यांना मुंबईच्या महापालिकेतील ९२ हजार कोटी रुपये हवे आहेत. म्हणून त्यांना मुंबईची सत्ता हवी आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.

मुंबईच्या (Mumbai) पैसऱ्यावर यांची नजर आहे. यांचे इंजिन चिनच्या खुसखोरीबद्दल आणि महागाईबद्दल काहीच बोलत नाही, असा हल्लाबोल अशोक चव्हाण यांनी भाजपवर (BJP) केला. आज कर्नाटकमध्ये चांगल्या पद्धतीने ताकद मिळत आहे. कर्नाटकचा निकाल देशाची दिशा बदलणारा निकाल असणार आहे, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

Ashok Chavan
Sanjay Raut : दादा येणार..दादा बोलणार अन् दादा जिंकणार; संजय राऊतांनी केली अजितदादांची स्तुती

लोकांनी आपल्याला कौल दिला, तर कधी बाजूला बसवले. मात्र, आम्ही कधी याला फोड त्याला फोड असे केले नाही. उद्धव ठाकरे यांनी वर्षा सोडले त्यावेळी हजारो लोक रस्त्यावर आले होते. मुख्यमंत्री पद सोडत असतानाही उद्धव ठाकरे यांना ताकद देण्यासाठी लोक होते, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com