संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर बाळासाहेब थोरांतांनी स्पष्टच सांगितलं

संभाजीराजेंना शिवसेना प्रवेशाची ऑफर असल्याची चर्चा
Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi news
Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi newsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यसभा निवडणूक घडामोडींना सध्या वेग आला आहे. अशातच राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारीची घोषणा केलेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. यामुळं त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू होती. यावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष काय भूमिका घेणार, याकडेही लक्ष लागले होते. आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर भूमिका मांडली आहे.

राज्यसभेच्या ६ पैकी ५ जागांवर भाजपचे २, शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा प्रत्येकी १ खासदार निवडून येऊ शकतो. त्यामुळे उर्वरित सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतून सहावी जागा शिवसेना लढविणार असल्याचे मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन खासदार निवडून जाण्याची शक्यता आहे.

Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi news
तसे नाही तर असे तरी आलोच...! वसंत मोरे अन् साईनाथ बाबर आले एकत्र

सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje) यांनी यापूर्वी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही. तर महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना लढविणार असल्याने शिवसेनेने उमेदवारीची घोषणा करण्यापूर्वीच संभाजीराजे यांना पक्ष प्रवेशाची ऑफर दिली होती, ती ऑफर अद्यापही कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. याच ऑफरच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाल्याची चर्चा होती. (Rajysabha Election latest news)

Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi news
वसंत मोरेंसह साईनाथ बाबर अडचणीत! पोलिसांकडून गुन्हा दाखल

संभाजीराजेंना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाईल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. पणे संभाजीराजेंनी अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष त्यांच्याबाबत सावध भूमिका घेत आहेत. यावर काँग्रस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, संभाजीराजे हे मुख्यमंत्र्यांना भेटले पण त्यांच्यात काय चर्चा झाली हे माहिती नाही. त्यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडी म्हणून आधी चर्चा होईल. शेवटी निर्णय हा एकत्र पद्धतीने होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com