Balasaheb Thorat On Ajit Pawar : काँग्रेसच्या थोरातांची अजितदादांच्या शपथविधीवर तिखट प्रतिक्रिया; '' त्यांना सत्तेची चटक...''

Ajit Oath Ceremoney : '' जे कालपर्यंत एकमेकांवर टीका करत होते. ते आज एकत्र आले आहे...''
Balasaheb Thorat, Ajit Pawar
Balasaheb Thorat, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : देशात 2014 पासून लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी करायला लावणारे आहे. राज्यात आज घडलेल्या घटना जनता सर्व पाहते आहे. याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचा न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. मात्र, आजची घडलेली घटना ही लोकशाही व राज्यघटने करता दुर्दैवी असल्याची खंतही काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असून राज्यातील जनता महाविकास आघाडीसोबत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला रवाना होण्यापूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले की, आजच्या शपथविधीची घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून लोकशाही व राज्यघटने करता ही दुर्दैवाची आहे. तसेच राज्यात विरोधी पक्षनेतेसारखं पद असताना तसं काम होणं अपेक्षित असतं. पण अजित पवारांना सत्तेची चटक लागली आहे अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पुढील काळात देश कसा चालेल हे काळजी वाटण्यासारखे आहे. पक्ष, पद्धत ,विचार घेऊन आपण पुढे जातो. कायम सत्ता पाहिजे असा खेळ सुरू झाला तर लोकशाही व्यवस्था अडचणीत येईल.

Balasaheb Thorat, Ajit Pawar
Balasaheb Thorat :..तर तो देशातला सर्वात मोठा विजय असेल; बाळासाहेब थोरातांना विश्वास

मागील वर्षापासून राज्यात सुरू झालेला राजकीय खेळ, घडलेल्या सर्व घटना राज्यातील जनता पहात आहे. जनतेला असे राजकारण नको आहे. असे राजकारण जेव्हा जनतेच्या न्यायालय जाईल तेव्हा जनता योग्य निर्णय देईल. कारण जनतेचे न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. भाजपाची कार्यपद्धती ही सत्ता मिळवण्यासाठी काहीही करण्याची आहे .जे कालपर्यंत एकमेकांवर टीका करत होते. ते आज एकत्र आले आहे. त्यांच्या मागच्या वाक्यांची तुलना केली तर किती टोकाची होऊ शकते हे आता जनता पाहते.

राज्यात महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi) ला अत्यंत अनुकूल वातावरण आहे लोकसभेला 38 आणि विधानसभेला 180 जागा निवडून येण्याचा अंदाज विविध सर्वेनी दिला आहे .त्यामुळे भाजप अस्वस्थ आहे. आगामी काळात सत्ता मिळावी आणि टिकावी याकरता काहीही केले जात आहे. लोकशाहीची मोडतोड होत आहे. राष्ट्रवादीचे मोठे नेते सत्ते सोबत गेले हे नक्कीच काळजी वाटणारे आहे.

Balasaheb Thorat, Ajit Pawar
NCP Crisis And Atul Benke : साहेब की दादा ? अतुल बेनकेंचे तळ्यात-मळ्यात; 'असा' घेणार निर्णय ?

काँग्रेस(Congress) व महाविकास आघाडीचा विचार हा लोकशाही व राज्यघटनेची बांधील असून आम्ही तो जपणार आहोत. जनता आमच्या सोबत असून अशा घडलेल्या घटनांमुळे जनतेचा विश्वास अजून महाविकास आघाडीवर भक्कम होऊन आगामी काळात राज्यात व देशात महाविकास आघाडीची सत्ता येईल असा ठाम विश्वासही आमदार थोरात यांनी व्यक्त केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com