राज ठाकरेंचं नाव घेताच बाळासाहेब थोरात म्हणाले, मी बोलू इच्छित नाही!

राज ठाकरेंमध्ये कधी काय बदल होतील हे सांगता येत नाही
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावरुन राजकारण चांगलंच तापलं होते. राज ठाकरे येत्या पाच जूनला अयोद्धेला जाणार होते. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. (Raj Thackeray latest news)

काही कारणामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी याबाबत टि्वट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून, मनसैनिकांनी उपस्थित राहावं, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. राज ठाकरेंच्या प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती. यावर विचारणा केली असता बाळासाहेब थोरातांनी राज ठाकरेंवर बोलू इच्छित नाही, अशी भूमिका घेतली. ते म्हणाले की, राज ठाकरेंमध्ये कधी काय बदल होतील हे सांगता येत नाही. आधी भोंग्याचे आंदोलन केले. लोकांना त्यांचे भाषण आवडले पण त्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रीतल जनतेने तसे स्वरूप दिले नाही. जनता समजूतदार असून, कुणी पेटवलं तरी पेटणार नाही.

राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला उत्तर प्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी जोरदार विरोध केला होता. राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येत पाय ठेवावा अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती. यावर मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला होता. राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा मनसेने दिला होता.यासंदर्भातले बॅनर मुंबईतल्या लालबाग परिसरात लावण्यात आले होते.

हा दौरा स्थगित झाल्याने वादावर तात्पुरता पडदा पडला आहे. तब्येतीच्या कारणामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा स्थगित केल्याचे समजते. डॅाक्टरांच्या सल्ल्यानंतर या दौऱ्याबाबत लवकरच मनसेकडून तारीख जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येत राजकारण करण्यासाठी येत नसून प्रभू रामाच्या दर्शनासाठी येत आहेत. रामनगरी अयोध्येत आपण स्वतः त्यांचे स्वागत करू. त्यांना विरोध करणारे भाजप खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांना आवरावे, अशा मागणीचे पत्र महाकाल मानव सेवा संस्थेच्या साध्वी कंचनगिरी व अन्य साधू महंतांनी यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठविले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com