Video Nana Patole : "देशानं आज संवेदनहीन…" जळगावमधील 'लखपती दीदी' मेळाव्यावरुन पटोलेंची PM मोदींवर बोचरी टीका

Nana Patole on PM Narendra Modi Nepal Bus Accident : "नेपाळ अपघातात 27 भाविकांचा मृत्यू झाला. नुकतेच मृतांवर त्यांच्या गावात एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. असे असतानाही महायुती सरकार आणि पंतप्रधानांना थोड्या जरी भावना आणि थोडी माणुसकी असती तर त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला असता."
Nana Patole, Narendra Modi
Nana Patole, Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Nana Patole News : "आज देशाने संवेदनहीन प्रधानमंत्री पाहिला आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत जळगावात 'लखपती दीदी' हा मेळावा होत आहे. या मेळाव्याची महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

या मेळाव्याला कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मंत्री आणि नेते देखील उपस्थित आहेत. मात्र, याच मेळाव्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरलं आहे.

एकीकडे जळगावातील अनेक लोकांचा नेपाळ बस अपघातात मृत्यू झाल्याने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे युतीचं सरकार तिकडे मेळाव्याच्या निमित्ताने सेलिब्रेशन करत आहे, अशी टीका विरोधक करत आहेत. अशातच आता लखपती दीदी मेळाव्यासाठी जळगावमध्ये (Jalgaon) आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

Nana Patole, Narendra Modi
Narendra Modi : सगळ्यांचा हिशेब व्हायला पाहिजे! ‘बदलापूर’चा उल्लेख न करता पंतप्रधान मोदींचं मोठं विधान...

संवेदनहीन प्रधानमंत्री

पटोले (Nana Patole) म्हणाले, "काठमांडू येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची बस दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातात 27 भाविकांचा मृत्यू झाला. नुकतेच मृतांवर त्यांच्या गावात एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. असे असतानाही महायुती सरकार आणि पंतप्रधानांना थोड्या जरी भावना आणि थोडी माणुसकी असती तर त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला असता. एकीकडे जनतेच्या डोळ्यात अश्रू आहेत तर दुसरीकडे हे लखपती दीदीचा उत्साह साजरा करत आहेत. आजवरच्या इतिहासात सर्वात संवेदनहीन प्रधानमंत्री या देशाने पाहिलाय."

Nana Patole, Narendra Modi
Jayant Patil: पक्षात येणाऱ्यांना स्वच्छ करून घेण्यासाठी आमच्याकडे लॉन्ड्री नाही; इन्कमिंगबाबत जयंतरावांचा टोला

तसेच, जळगाव येथे आयोजित कार्यक्रम हा जनतेच्या पैशाने होतोय, हा शासकीय कार्यक्रम आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात अश्रू आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच पैशाने कार्यक्रम घेऊन सरकार पीडितांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत का? असा प्रश्न निर्माण होत असल्याचंही पटोले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com