Sachin Sawant Criticized BJP : '' देवाभाऊ सुपरफास्ट? शिंदे कुठे गेले? ते सुपर...? ''; काँग्रेसच्या सचिन सावंतांनी भाजपला डिवचलं

Congress Vs BJP : '' पिक्चर इधर भी बाकी है मेरे दोस्त...''
Sachin Sawant , Devendra Fadnvis, Eknath Shinde
Sachin Sawant , Devendra Fadnvis, Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली होती.यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात शिंदे यांनी सत्ता स्थापन केली. या शिंदे फडणवीस सरकारला शुक्रवारी (दि.30) वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षपूर्तीनिमित्त एकीकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी हे सर्वसामान्यांचं सरकार असून त्यांच्या हिताचेच निर्णय घेताना आपल्या यशस्वी कामगिरीचा दावा केला आहे. याचवेळी विरोधी पक्षांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधतानाच शिंदेंनाही डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी शुक्रवारी(दि.३०) सोशल मीडियावर शिंदे फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून महाराष्ट्र भाजपच्या एका जाहिरातीवरुन शिंदेंना खोचक टोला लगावला आहे. भाजपाने ' प्रगतीमान सरकारचा गतिमान निर्णय' अशी कॅप्शन देत ट्विटरवरून जाहिरात केली आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो वापरत ‘देवाभाऊ सुपरफास्ट..’ असे कौतुकोद्गार काढले आहेत.

Sachin Sawant , Devendra Fadnvis, Eknath Shinde
Pune News : जीवाचे बरं वाईट झालं तरी उपोषणापासून मागे हटणार नाही: दरेकरांचा इशारा!

ट्विटमध्ये सावंत काय म्हणाले..?

काँग्रेसच्या सचिन सावंतां(Sachin Sawant) नी भाजपावर निशाणा साधला आहे. यावेळी देवाभाऊ सुपरफास्ट? शिंदे कुठे गेले? ते सुपर स्लो का? असा खोचक सवाल सावंत यांनी केले आहेत. शिवाय, पिक्चर इधर भी बाकी है मेरे दोस्त असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्याबरोबरच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो असलेली जाहिरात दिली आहे. त्याला शिंदे सरकारने गेल्या वर्षभरात घेतलेल्या निर्णयाची माहिती देत महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व अंमलबजावणी वेगवान अशी कॅप्शन दिली आहे. तसेच पुन्हा येणार… शिंदे सरकार’ असा दावाही करण्यात आला आहे.

Sachin Sawant , Devendra Fadnvis, Eknath Shinde
Chandrashekhar Azad Attack : 'मुख्यमंत्री योगी माझ्या मरणाची वाट पाहत होते, पण..' ; हल्ल्यातून बचावल्यानंतर आझादांचा हल्लाबोल!

जाहिरातीत काय..?

महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग शेजारच्या गुजरात तसेच भाजप(BJP)शासित राज्यात जात असल्याची ओरड होत असताना बुधवारी झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. हे प्रकल्प पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नंदुरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई या भागांत होणार असून यामुळे सुमारे 1 लाख 20 हजार रोजगारनिर्मिती होणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com