Pune News : जीवाचे बरं वाईट झालं तरी उपोषणापासून मागे हटणार नाही: दरेकरांचा इशारा!

Manchar News : माझा जीव गेला तरी चालेल, पण...
Pune Manchar News :
Pune Manchar News : Sarkarnama
Published on
Updated on

Pune Manchar News : “गेल्या पाच दिवसापासून शेतकरी उपोषणाला बसले आहेत. माझ्यासह सहभागी झालेल्या काही शेतकऱ्यांना उच्च रक्तदाब व मधुमेहाचा आजार आहे. पण वैद्यकीय तपासणी करण्याचे सौजन्यही दाखवले नाही. राज्य सरकारचा कोणताही प्रतिनिधी साधी विचारपूस करण्यासाठी अद्याप येथे आलेला नाही. ही बाब राज्य सरकारला शोभा देणारी नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी माझ्या जीवाचे बरेवाईट झाले तरी चालेल पण उपोषणापासून मी व माझे असंख्य कार्यकर्ते हटणार नाहीत,” असा निर्वाणीचा इशारा पुणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे माजी गटनेते देविदास दरेकर (Devidas Darekar) यांनी दिला. (Latest Marathi News)

Pune Manchar News :
Kolhapur Politic's : सरकारच्या वर्धापनदिनीच शिंदे गटाला धक्का, हातकणंगल्यात पक्षात उभी फूट; उपनरागध्यक्षपदी भाजपची बाजी

मुंबईतील आझाद मैदान येथे कळमोडी धरणातील पाणी सातगाव पठारासह (ता.आंबेगाव) शिरूर व खेड तालुक्यातील कोरडवाहू गावांना मिळावे, या मागणीसाठी दरेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सोमवार (ता.२६) पासून उपोषणाला बसले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारकडून घेतली जात नसल्याबद्दल दरेकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

Pune Manchar News :
Kolhapur Politic's : सरकारच्या वर्धापनदिनीच शिंदे गटाला धक्का, हातकणंगल्यात पक्षात उभी फूट; उपनरागध्यक्षपदी भाजपची बाजी

दरेकर म्हणाले म्हणाले, "कळमोडी धरण बांधून १२ वर्षे पूर्ण झाली. मात्र आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भाग व खेड तालुक्यातील अनेक गावे अद्याप पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पाण्याविना या भागाचा विकास रखडलेला आहे. वर्षातील सहा महिने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागतो. त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते."

देविदास दरेकर पुढे म्हणाले, "या भागातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर भूसंपादनाचे शिक्के पडलेले आहेत. त्यामुळे त्यांना कोणतीही बँक कर्ज देत नाही. वारस नोंदी रखडल्या असल्याने घराघरात भाऊबंदकीचे वाद सुरू आहेत. बंद पाइपलाइन द्वारे कळमोडी उपसा सिंचन योजना प्रभावीपणे राबवावी. त्यामुळे पाच हजार ६५ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येईल. डिंभे धरणातील पाणी थेट बोगद्याद्वारे नगर जिल्ह्यात नेण्याचा प्रकार रद्द करावा. त्याऐवजी आंबेगावच्या आदिवासी गावांना धरणातील पाणी द्यावे.”

पोषण स्थळाला आंबेगाव तालुका मुंबई रहिवासी संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब भापकर, उद्योजक महेश ढमढेरे, राजू सैद, बाळासाहेब पवार, युवासेना जिल्हाप्रमुख प्रविण थोरात पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील पुणे जिल्ह्यातील मात्तबर नेते म्हणून देविदास दरेकर यांना ओळखले जाते. पण त्यांच्या उपोषणाविषयी असलेल्या उदासीनतेमुळे शेतकरी नाराज आहेत..” असे युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com