सोबतचा कार्यकर्ता पडला तरी ज्योतिरादित्य शिंदे धावतच राहिले! व्हिडीओ व्हायरल

ज्योतिरादित्य शिंदे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
Jyotiraditya Scindia
Jyotiraditya ScindiaSarkarnama

नवी दिल्ली : केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांचा एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. ते सध्या आपले शहर ग्वाल्हेरमध्ये असून विविध कार्यक्रमांमध्येही सहभागी होत आहेत. एकाठिकाणी त्यांनी क्रिकेट स्टेडियममध्ये क्रिकेट खेळले. त्यानंतर ते कार्यकर्त्यांसोबत धावत सुटल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सर्व जण धावत असताना असं काही घडलं की ज्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. धावताना घडलं असं की, शिंदे यांच्यासोबत त्यांचे समर्थक धावत होते. धावत असताना एका कार्यकर्त्याचा तोल जाऊन तो खाली पडला.पण त्यानंतरही ज्योतिरादित्य शिंदे थांबले नाहीत. ते इतर समर्थकांसह धावतच राहिले, असे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Jyotiraditya Scindia
मुख्यमंत्री महोदय, अधिकारी तुमच्याबरोबर नाहीत! महेश झगडे असं का म्हणाले?

शिंदे यांच्यासोबत धावत असलेले इतरही कार्यकर्ते व पदाधिकारी पडलेल्या कार्यकर्त्यासाठी थांबले नाहीत. या व्हिडीओची सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. त्यावरून अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत. तसेच व्हिडीओही व्हायरल झाला आहे. शिंदे हे 9 डिसेंबर रोजी ग्वाल्हेरमधील काम सुरू असलेल्या क्रिकेट स्टेडियमच्या (Cricket Stadium) पाहणीसाठी आले होते. यावेळी कार्यकर्त्यांसोबत ते क्रिकेटही खेळले. त्यानंतर ते सर्वांसोबत धावले अन् हा प्रकार घडला.

ज्योतिरादित्य शिंदे यांचा दोन महिन्यांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मागील वर्षी त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) सत्तांत्तर झाले. काँग्रेसची (Congress) सत्ता जाऊन भाजप पुन्हा सत्तेत विराजमान झाले. शिंदे हे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या यंग ब्रिगेडमधील आघाडीचे नेते होते. पण मध्य प्रदेशातील राजकीय स्थिती, राज्यातील नेत्यांशी असलेले वाद आणि सत्ता समीकरणांमुळे त्यांनी भाजपची वाट धरली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com