लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात जोरात वारं वाहत आहे. हे वारं महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे. गद्दारीचा शिक्का लागलेली मंडळीची पार्टी संपली आहे. गद्दारी करुन बाहेर पडेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 40 आमदारांची लवकरच घरवापसी होईल, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.
केंद्राच्या नवीन मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही जागा मिळाली नाही. अजितदादांना (Ajit Pawar) जे पाहिजे होते ते त्यांना मिळाले नाही. ते मिळवण्यात त्यांना अपयश आले आहे. कुणालाही मान सन्मान हा त्याचा संख्याबळावर मिळतो. अजित पवारांची स्थिती आणि सन्मान करण्यासारखे राहिलेली नाही,असा टोला त्यांना लगावला.
"जे मिळेल ते खावे,राज्यमंत्रीपद मिळाले तर ठीक नाहीतर तेही मिळणार नाही, अशी अजितदादांची अवस्था आहे," असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला. भाजप म्हणजे वापरा आणि फेका, हे उद्धव ठाकरेंना आधीच समजले म्हणून ते सावध झाले, असे वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवार म्हणाले, "केंद्रात भाजपचे सरकार आले नसते तर अजित पवार महायुतीतून बाहेर पडले असते. त्यांच्या सर्व प्रकारच्या चौकशा बंद झाल्या आहेत. प्रफुल पटेल यांची ईडी चौकशीही बंद झाली आहे. छगन भुजबळांचेही तसेच झाले, ही नवी आयडिया आहे, सरकार किती दिवस टिकेल हे लवकरच समजेल,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.