Mahavikas Aghadi : '...हे तर आघाडी धर्माला गालबोट; आघाडी धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे', काँग्रेस नेत्यांची उद्धव ठाकरेंवर जाहीर नाराजी!

Shivsena UBT and Congress News : खिचडीचोर उमेदवार उद्धव ठाकरेंनी आमच्या माथी मारला असल्याचं संजय निरुपम यांनी ठाकरे गटाचे उमेदार अमोल कीर्तिकर यांच्याबाबत म्हटलं आहे
Shivsena UBT and Congress
Shivsena UBT and CongressSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, तर त्यांनी जाहीर केलेल्या उमेदवारी यादीवरून काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाल्याचे दिसत आहे. काही जागांवर चर्चा सुरू असताना, आघाडी धर्म पाळणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, 'उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सांगली आणि मुंबईतील धारावी ज्यामध्ये येते तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही, असं माझं मत आहे. त्यांनी असं जाहीर करायला नको होतं, ज्यावेळी आम्ही चर्चेत आहोत.'

'यामध्ये शेवटी आम्ही आघाडीत आहोत आणि आघाडी धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. त्यामुळे त्यांनी ही जागा जाहीर करणं योग्य नाही, आमचा आजही आग्रह या जागांसाठी आहे. एवढच नाहीतर भिवंडीच्या जागेसाठीसुद्धा आमचा आग्रह आहे. ज्या जागा जाहीर केल्या आहेत, त्याबाबत शिवसेनेने फेरविचार करावा असं मी म्हणेन.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivsena UBT and Congress
Lok Sabha Election 2024 : ठाकरेंच्या यादीनंतर घमासान; काँग्रेस नेत्यांनी दिला निर्वाणीचा इशारा...

याचबरोबर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले, 'महाविकास आघाडीच्या जागांबाबतच्या बैठकीतील निर्णय अंतिम होणे बाकी असताना, ज्या दोन जागांवर उमेदवार घोषित केलेले आहेत. हे आघाडी धर्माला निश्चितपणे गालबोट लावल्यासारखं मला वाटतं. यावर जर त्यांनी पुनर्विचार केला, तर तिन्ही पक्ष मिळून खुल्या मनाने या निवडणुका आपल्याला पार पाडता आल्या असत्या.'

तसेच 'वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या निर्णयामुळे पुरोगामी विचारसरणीच्या मतांचे विभाजन होईल आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला मिळेल. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा आपल्या निर्णयाचा पूर्ण विचार करण्याची आवश्यकता आहे,' असंही वडेट्टीवारांनी म्हटलं आहे.

तर वायव्य मुंबईतील जागेवरून ठाकरे गटाने अमोल कीर्तिकरांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यावर मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी विरोध दर्शवला आहे. खिचडीचोर उमेदवारास ठाकरेंच्या शिवसेनेने आमच्या माथी मारले आहे, आम्ही याचा जाहीरपणे विरोध करतो आहोत. किमान मी तरी अशा खिचडीचोर उमेदवाराबरोबर काम करणार नाही. मी माझ्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अपेक्षा करतो की, अशा उमेदवाराबाबत ते आक्षेप नोंदवतील.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Shivsena UBT and Congress
Lok Sabha Election 2024 : 'आमचं ठरलंय!' मोहिते पाटलांनी वाढवली भाजपची धडधड; माढ्यात राजकीय उलथापालथ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com