Aslam Shaikh Death Threats: आमदार अस्लम शेख यांना जिवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

Aslam Shaikh Threat Call : धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख गँगस्टर गोल्डी ब्रार अशी सांगितली आहे.
Aslam Shaikh
Aslam Shaikh Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेसचे नेते आणि मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. गोल्डी ब्रार बोलत असल्याचे सांगत एका अज्ञात व्यक्तीकडून अस्लम शेख यांना धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी रविवारी बांगूरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अस्लम शेख यांच्या फोनवर 5 ऑक्टोबरला सकाळी दहाच्या दरम्यान फोन आला. हा फोन अस्लम शेख यांच्या पीएने घेतला. या वेळी दोन दिवसांत आमदार अस्लम शेख यांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली. धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख गँगस्टर गोल्डी ब्रार अशी सांगितली आहे.

Aslam Shaikh
Gulabrao Patil News : " नोकरी अन् छोकरी एवढंच स्वप्न होतं..."; मंत्री गुलाबराव पाटील मनातलं बोलले

या धमकीनंतर बांगूरनगर पोलिस ठाण्यात धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा फोन कॅनडातून आला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. गँगस्टर गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा असल्याचे बोलले जाते.

दरम्यान, गँगस्टर गोल्डी ब्रार हा फरार कॅनेडियन गँगस्टर असून, तो सध्या फरार असल्याचे सांगितले जाते. गँगस्टर गोल्डी ब्रार हा पोलिसांच्या रडारवर आहे.,तर काही दिवसांपूर्वी गोल्डी ब्रार याने बॉलिवूड स्टार सलमान खानला धमकी दिली होती.

Edited by Ganesh Thombare

Aslam Shaikh
NCP Crisis : राष्ट्रवादीची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात; शरद पवारांनंतर अजितदादांचीही याचिका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com