रवी नाईक यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार?

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच नाईक आजच भाजपमध्ये दाखल होऊ शकतात.
Ravi Naik Resigns
Ravi Naik ResignsSarkarnama
Published on
Updated on

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फलेरो (Luizinho Faleiro) यांनी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसला (Congress) रामराम ठोकला होता. त्यानंतर दोन महिन्यातच काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. गोव्याचे आणखी एक माजी मुख्यमंत्री व आमदार रवी नाईक (Ravi Naik) यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गोव्यातील विधानसभेची निवडणूक पुढील काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्याआधीच काँग्रेसमधील दोन बडे नेते, माजी मुख्यमंत्र्यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. नाईक यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला. ते पोंडा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो.

Ravi Naik Resigns
स्वत:ला बदला, नाहीतर...! पंतप्रधान मोदींचा 'त्या' खासदारांना सूचक इशारा

काँग्रेसने 2017 च्या निवढणुकीत 17 जागांवर विजय मिळवला होता. आता हा आकडा दोनपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे गोव्यात सध्या काँग्रेसची दयनीय स्थिती झाली आहे. नाईक हे दुसऱ्यांदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी ऑक्टोबर 2000 मध्येही भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी मनोहर पर्रीकर सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर दोनच वर्षात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

मागील दीड-दोन वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये फारसे सक्रीय नव्हते. त्यांच्या दोन मुलांनीही यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीलाही ते गैरहजर होते. नाईक हे 1991 ते 1993 दरम्यान आणि 1994 मध्ये 2 ते 4 एप्रिलदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते. ते 1998-99 दरम्यान लोकसभेचे सदस्यही होते.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी तृणमूलमध्ये दाखल झालेले फलेरो हे गोवा काँग्रेसचे (Goa Congress) दिग्गज नेते मानले जात होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांना गोव्यात समन्वय समितीचे अध्यक्ष करण्यात आले होतं. पण त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं पक्षाला धक्का बसला होता. पुढील वर्षी गोव्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यापाश्वर्भूमीवर तृणमूल काँग्रेसकडून गोव्यातील निवडणूक लढवली जाणार आहे. फलेरो यांच्यासारखा बडा नेता त्यांच्या गळाला लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com