स्वत:ला बदला, नाहीतर...! पंतप्रधान मोदींचा 'त्या' खासदारांना सूचक इशारा

पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत हा इशारा दिला आहे.
Narendra Modi
Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये (Parliament Winter Session) विविध मुद्यांवर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारला घेरले जात आहे. पण भाजपचे (BJP) अनेक खासदार गैरहजर राहत असल्याचे समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांना ठणकावलं आहे. भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत त्यांनी या खासदारांना थेट इशारा दिला आहे.

मागील अधिवेशनामध्येही भाजपचे खासदार संसदेत गैरहजर राहत असल्याचे समोर आले होते. त्यावेळीही पक्षाच्या बैठकीत मोदींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. पण त्यानंतरही सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशानदरम्यानही हेच पाहायला मिळत आहे. आज झालेल्या भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला. यावेळीही पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली.

Narendra Modi
मी अडवाणींना अटक करून संदेश दिला होता की...! लालूंच सुचक वक्तव्य

पंतप्रधान मोदी म्हणाले, संसदेत सर्व खासदारांनी उपस्थित राहायला हवे. संसदेत कोणतंही विधेयक असो वा नसो, खासदारांनी नियमितपणे उपस्थित राहायला हवं. तुम्ही स्वत:ला बदललं नाही, तर पुढील काळात बदल होतील. हे बदल आपोआप होती. त्यामुळे संसदेत आणि बैठकांना नियमितपणे उपस्थित रहा. लहान मुलांसारखे सतत सांगायला लागणे चांगले नाही, अशा कडक शब्दांत पंतप्रधानांनी खासदारांना इशारा दिल्याचे समजते.

Narendra Modi
अधिवेशनात आरक्षणाचे प्रस्ताव? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी सरकारवा विविध मुद्यांवरून धारेवर धरले आहे. कृषी कायदे, हमीभाव, नागालँडमध्ये नागरिकांची झालेली हत्या, बारा खासदारांचे निलंबन, कोरोना आदी मुद्यांवर विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या गैरहजर राहणाऱ्या खासदारांना सूचक इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com