Nana Patole: ...म्हणून मी पटोलेंचे पाय धुतले; काँग्रेस कार्यकर्त्यांने सांगितलं कारण, पाहा व्हिडिओ

Congress worker washing Nana Patole feet sparks controversy in Maharashtra BJP criticises: "नाना पटोले हे माझे दैवत आहेत, मी एक वेळ नाही तर दहा वेळेस त्यांच्या पायावर पाणी टाकीन,"
Congress worker washing Nana Patole feet sparks controversy in Maharashtra
Congress worker washing Nana Patole feet sparks controversy in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Akola News: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला दणदणीत विजय मिळवून देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याच्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर भाजपने (BJP) पटोलेंवर 'चिखलफेक' करीत त्यांना चांगलेच 'धुतले'आहे.

नानांचे पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव काल रात्रीपासून (मंगळवार) नॉट रिचेबल असल्याने वेगळीच चर्चा रंगली होती. विजय नेमका कुठे गेला, असा प्रश्ना काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला होता. आज विजय याने त्यावर स्पष्टीकरण दिले.

"नाना पटोले हे माझे दैवत आहेत, मी एक वेळ नाही तर दहा वेळेस त्यांच्या पायावर पाणी टाकीन," असे सांगत विजय याने विरोधकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.

Congress worker washing Nana Patole feet sparks controversy in Maharashtra
Vasmat BJP News: भाजपमध्ये नक्की चाललंय काय? पदाधिकाऱ्यांचा रस्त्यावरच धुडगूस!

"शेगाव येथील गजानन महाराज यांची पालखी अकोले वडेगाव येथे आली असताना पटोले यांनी पायी जाऊन गजानन महाराजांचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर नानाभाऊंचे पाय चिखलाने माखले होते. ते दिसल्याने मी पाणी आणून त्यांच्या पायावर टाकले, त्यावेळी त्यांनी मला तसे करण्यास मनाई केली," असे विजय यांनी सांगितले आहे.

नाना पटोलेंचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेते राम कदम, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी त्यावर हल्लाबोल केला. त्यावर विजय गुरव यांनी या तीनही नेत्यांचा समाचार घेतला.

"राम कदम, अमोल मिटकरी, संजय शिरसाट यांना माझे आवाहन आहे,त्यांनी या विषयावर राजकारण करु नये.पटोले हे माझे दैवत आहेत, मी एक वेळ नाही दहा वेळेस त्यांच्या पायावर पाणी टाकीन," असे सडेतोड उत्तर विजय यांनी दिले आहे.

या घटनेचा महाराष्ट्रभर भाजपकडून निषेध व्यक्त केला जात आहे.संतप्त कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या निषेधाच्या घोषणा देत आहेत. त्याच्या पोस्टरला जोडे मारून ते पायदळी तुडवत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com