Vasmat BJP News: भाजपमध्ये नक्की चाललंय काय? पदाधिकाऱ्यांचा रस्त्यावरच धुडगूस!

Case Registered Against Eight People Including BJP Leader Shivdas Budewar :भाजपच्या या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच हाणामारी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. काळीपेठ भागात हा प्रकार घडला.
Vasmat BJP News
Vasmat BJP NewsSarkarnama

Vasmat Crime News :हिंगोली जिल्ह्यातील वसमतमधील (Hingoli) भाजपमध्ये काय चालले आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. वसमत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बुडेवार यांच्यासह सहा ते सात जणांनी रस्त्यावर हाणामारी करत धुडगूस घातल्याची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

याप्रकरणी बुडेवार यांच्यासह आठ जणांवर वसमत (Vasmat) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाजपच्या या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच हाणामारी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. काळीपेठ भागात हा प्रकार घडला. यातील काही जण फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Vasmat BJP News
Kiran Choudhry: काँग्रेसला दे धक्का; माजी मुख्यमंत्र्यांची सून किरण चौधरी यांचा राजीनामा; माय-लेकी भाजपमध्ये प्रवेश करणार

गोविंद येजगे, बालाजी कदम, जबी खान पठाण, शेख अल्ताफ, शेख युसुफ, शेख अनिस, शेख इक्बाल, संकेत नगपल्ली यांच्यासह इतर दोघांवर गुन्हा दाखल केल्या असल्याचे वसमत पोलिसांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com