Ramesh Chennithala : संसदेला नमन, संसद बदलली, आता संविधानाला नमन म्हणजे..; रमेश चेन्निथला यांची भाजपवर सडकून टीका

Ramesh Chennithala criticizes BJP from Mumbai : मुंबई येथील विजय संकल्प मेळाव्यात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. महाराष्ट्राने भाजपचा विजय रथ 400 पार होवू दिला नसल्याचेही रमेश चेन्निथला यांनी म्हटले.
Ramesh Chennithala
Ramesh ChennithalaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मुंबईतून भाजप आणि पंतप्रधान यांच्यावर सडकून टीका केली. "नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा संसदेला नमन केले आणि संसद भवन बदलले. यावेळी मोदींनी संविधानाला नमन केले. आता ते बाबासाहेबांचे संविधान संपवायला निघाले आहेत", असा गंभीर आरोप रमेश चेन्निथला यांनी केला.

'लोकसभा निवडणुकीत भाजपचा 400 पार रथ महाराष्ट्रानेच रोखला. आता विधानसभा निवडणुकीला असाच विजय संपन्न करून महाराष्ट्राला पुन्हा भरभराटीचे दिवस आणायचे आहे', असेही रमेश चेन्निथला यांनी म्हटले.

प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थित एससी विभागाचा विजय संकल्प मेळावा झाला. यात विधानसभा निवडणुकीला विजयासाठीच समोरे जा, अशा सूचना रमेश चेन्निथला यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, एससी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया, काँग्रेसच्या (Congress) मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.

मुंबईकरांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई काँग्रेसने आजपासून न्याय यात्रेचा प्रारंभ केला आहे. न्याय यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांकडे लक्ष वेधले जाणार आहे. महायुती सरकारच्या विरोधात महायुतीचे पापपत्र जनतेच्या हाती दिले जाणार आहे.

Ramesh Chennithala
MVS Vs Mahayuti : मोठी बातमी! राज्यात सत्तापरिवर्तन, महाविकास आघाडीचं सरकार येणार? 'या' सर्व्हेनं महायुतीचं टेन्शन वाढवलं

"भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यपद्धतीवर रमेश चेन्निथला यांनी हल्लाबोल चढवला. नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा संसदेला नमन केले आणि संसद भवन बदलले. यावेळी मोदींनी संविधानाला नमन केले. आता ते बाबासाहेबांचे संविधान संपवायला निघाले आहेत", असा आरोप केला.

'देशात सर्वांत जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रातील महायुती सरकारने केला आहे. विकासकामे होत नाहीत फक्त लूट सुरू आहे. भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरू असलेल्या भाजपच्या वल्गना आठवत आहे. महाराष्ट्रातील जनतेला देखील आठवत आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांवर 70 हजार कोटींचा आरोप केला, प्रफुल्ल पटेलांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, असे असले तरी त्यांना भाजपने सत्तेत सहभागी करून घेतले आहे. पवित्र करून घेतले आहे. यामुळे भाजपने आता नैतिकतेच्या गोष्टी करू नये', असा देखील सल्ला रमेश चेन्निथला यांनी दिला.

Ramesh Chennithala
Nana Patole News : नाना पटोलेंनी मुख्यमंत्रिपदाबाबत स्पष्टच सांगितले; म्हणाले, 'हा असणार महाविकास आघाडीचा चेहरा...'

रमेश चेन्निथला यांचा आदेश...

आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना रमेश चेन्निथला यांनी आरक्षणाचा लाभ द्यायचा असेल, तर जातनिहाय जनगणना करावी लागणार आहे. तसेच 50 टक्क्यांची मर्यादा देखील हटवावी लागणार आहे. तर हा गुंता सुटेल, असे रमेश चेन्निथला यांनी सांगितले. लोकसभेत भाजपकडून 400 पारच्या वल्गना होत होत्या. पण त्यांचा हा रथ महाराष्ट्रानेच रोखला. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेला यश संपादन करायचे आहे. राज्यातील एससी, एसटी प्रवर्गाच्या 54 जागांतील जास्तीत, जास्त जागा जिंकण्याच्या कामाला लागा, असे देखील रमेश चेन्निथला यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com