Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. महाविकास आघाडी व महायुतीकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे. त्यातच आता मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण यावरून महाविकास आघाडीत चर्चा रंगली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला जाऊन आल्यानंतर त्यांच्या नावाला संमती मिळाली अशी चर्चा प्रसार माध्यमांत रंगली होती. मात्र, यावर उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सर्वांच्या दाव्यातील हवाच काढली आहे. (Nana Patole News)
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून चर्चा जोरात रंगली आहे. जागावाटपाची चर्चा एक दोन दिवसात सुरु होणार आहे. त्यामध्ये आघाडीतील काँग्रेस (Congress), शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एकत्र बसणार आहेत. त्यामुळे लवकरच जागावाटप पूर्ण होईल, अशी चर्चा आहे. त्यातच नाना पटोले यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार असा सवाल केल्यानंतर? त्यांनी महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल, असे सांगत विषयच संपवला.
पटोले यांनी मुख्यमंत्रीपदावरून बोलताना सांगितले की, महाविकास आघाडी म्हणून आमचा चेहरा आम्ही पुढे करु. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील भ्रष्ट भाजप महायुतीच्या सरकारला पराभूत करू, अशी भूमिका आम्ही आम्हा सगळ्यांची असल्याचे सांगितले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्याची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यामुळे त्यांची काँग्रेसच्या हायकमांडसोबत मुख्यमंत्री पदावरून चर्चा झाली असेल अशी चर्चा रंगली होती. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय येत्या काळात आघाडीतील घटक पक्ष एकत्रित बसून घेतील असे सांगत, त्याबाबत घाई केली जाणार नाही, असे सांगितले.
दरम्यान, मला गुलाबी रंगांमध्ये बोलायचे नाही. मात्र, गुलाबी अळीचा प्रादुर्भाव असतो तो आहे असे नाना पटोले म्हणाले. ते पुढे म्हणाले की 270 कोटींचा खर्च प्रसिद्धीसाठी जनतेच्या घामाचा पैशातून महायुती सरकारकडून केला जात आहे. मात्र, त्याचा काहीच फायदा होणार नाही. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये ही भूमिका काँग्रेसची असल्याचे नाना पटोले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.