Congress:दारुण पराभवानंतर G-23 नेते पुन्हा ॲक्टीव्ह ; म्हणाले..पक्षासाठी आयुष्य दिलंय

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा झंझावात, उत्तरप्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांची दाणादाण उडवली.
Sonia Gandhi, Rahul Gandhi
Sonia Gandhi, Rahul Gandhisarkarnama

नवी दिल्ली : पाच राज्यातील निवडणुकांमध्ये कॉग्रेसचा (congress)सुपडासाफ झाला. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या कॉग्रेसची अवस्था सध्या वाईट आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा झंझावात, उत्तरप्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांची दाणादाण उडवली. या पार्श्वभूमीवर कॉग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

त्यामुळे कॉग्रेसमधील नाराज जी-२३ (G-23)पुन्हा सक्रिय झाले आहे. कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आजाद यांच्या घरी 'जी २३' नेत्यांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत नव्या अध्यक्षांची मागणी करण्यात आल्याचे समजते.

''कॅाग्रेसने लवकरात लवकर आपतकालीन बैठक बोलवून नव्या अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावी,'' अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. या बैठकीला कपिल सिब्बल, मनीष तिवारी आदी नेते उपस्थित होते . यापूर्वी जी-२३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून अध्यक्ष निवडीबाबत सांगितले होते. 'पाचही राज्यात कॉग्रेसचा पराभव होईल,' हे निकालापूर्वीच या नेत्यांनी सांगितले होते. कारण निकालाच्या पूर्वीच (१० मार्च) कॉग्रेसचे नेता राहुल गांधी यांच्या घरी बैठक झाली होती.

Sonia Gandhi, Rahul Gandhi
Punjab:तेरा डॅाक्टर करणार जनसेवा ; 'आप'ने रचला नवा इतिहास

या बैठकीला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, कॉग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वा़ड्रा, महासचिव केसी वेणुगोपाल आदी उपस्थित होते. 'सप्टेंबर २०२२ पर्यत नवीन अध्यक्षाची निवड करण्यात यावी,' असे या बैठकीत ठरले. काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांच्या गटामधील सदस्यांनी अनेक दिग्गज नेत्यांनी हा पराभव म्हणजे 'आम्ही तुम्हाला आधीच कल्पना दिलेली' अशा प्रकारचा आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य असणाऱ्या गुलाम नबी आजाद यांनी, ''मी थक्क झालोय. एकामागोमाग एक वेगवगेळ्या राज्यांमध्ये पक्षाचा पराभव पाहून मनाला फार उदास वाटतं. आम्ही पक्षासाठी आमच्या तारुण्याचा संपूर्ण काळ आणि आयुष्य दिलंय,'' असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

Sonia Gandhi, Rahul Gandhi
Manipur: भाजपला दणदणीत विजय मिळून देणारे बीरेन सिंह दुसऱ्यांदा होणार मुख्यमंत्री

पाच राज्यातील पराभवानंतरही काही कॉग्रेस नेते राहुल गांधी यांचे कैातुक करण्यात व्यग्र असल्याचे दिसते. ''राहुल आणि प्रियंका हे जनतेच्या विषयावर चर्चा करीत आहेत. देशात भाजपवर टीका करण्यात राहुल गांधी अग्रेसर आहेत,'' असे गुजरातचे प्रभारी रघु शर्मा यांनी सांगितले.

उत्तरप्रदेशात कॉग्रेसला केवळ दोनच जागा मिळाल्या आहेत. त्यांना फक्त दोन टक्केच मते मिळाली आहेत. पंजाबमध्ये आपने कॉग्रेसचा धुव्वा उडवला आहे. याठिकाणी त्यांना फक्त ११ जागा मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा पराभव झाला आहे.

Sonia Gandhi, Rahul Gandhi
Maharashtra Budget :सीएनजी स्वस्त होणार ; पेट्रोल-डिझेलवरील करात कपात नाही

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाचही राज्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भावुक टि्वट करीत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी जनतेचे आभार मानले असून, पराभवाला स्वीकार केला आहे. राहुल गांधी (rahul gandhi)निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे देखील आभार मानले आहेत.

''या पराभवातून आपल्याला एक शिकवण मिळाली असून, देशातील जनतेसाठी आपण काम करत राहू, '' अशा भावना राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये व्यक्त केल्या आहेत. २०१९ मध्ये प्रियंका या राजकारणात सक्रीय झाल्या. गेल्या निवडणुकीत त्यांच्या सभांना गर्दी होत होती. पण यंदाच्या निवडणुकीत त्यांची जादू चालली नाही. त्यामुळे भाऊ-बहीण यांच्या राजकीय जीवनाला हा मोठा झटका असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com