
मुंबई : जनतेचे मूळ प्रश्न बाजूला सारण्यासाठी धर्मांधतेचे वातावरण तयार केले जात आहे. क्रीडा संकुलाला नाव देण्याचे काम महापालिकेचे आहे. पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) क्रिडा संकुलाचे नामकरण करायला गेले नाहीत. त्यांच्या निधीतून या संकुलाचे सुशोभिकरण केले आहे, त्याचे ते उद्घाटन करणार आहेत. संकुलाला टिपू सुलतान हे नाव पूर्वीपासूनच होते, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.
मालाड मधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. संकुलाबाहेर भाजप आणि बजरंग दलाने जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. भाजप (BJP) आणि बजरंग दलाकडून या नामकरणाला जोरदार विरोध करण्यात येत आहे, त्यावर पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. (Tipu Sultan Name Controversy)
या वेळी पटोले म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे. न्यायमूर्ती सांगत असतील की केंद्र सरकारचा आमच्यावर दबाव आहे. संवैधानिक व्यवस्था आज धोक्यात आली आहे. मागील सात वर्षात देशाचे चित्र बदलले, असा आरोप त्यांनी केला. देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे त्यामुळे आपण सावध रहायला हवे, असेही पटोले म्हणाले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मानेवरील शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी सार्वजनीक कार्यक्रमात हजेरी लावली. यावरही पटोले यांनी भाष्य केले. ते म्हणाले, कोरोना काळात देशाच्या पंतप्रधानांनी काळजी घेतली पाहिजे असे सांगितले आहे. आपण शाळा, बाजार, सगळे बंद केले होते. देशाच्या पंतप्रधानांचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पाळले तर भाजपला काय त्रास होतो. भाजपच्या पोटात दुखते, असा सवाल त्यांनी केला.
मालेगावमधील काँग्रेसच्या नरगसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावर बोलताना पटोले यांनी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली. हे चालत राहणार, कोण इकडे येणार कोण तिकडे जाणार यात टेन्शन घेण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले. फडणवीस यांच्या काळात काय झाले. धिंगाणा सुरू होता. आमच्या मंत्र्यांनी जी भूमिका मांडली ती गैर नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अलर्ट करणे गैर नाही, असेही पटोले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.