Nana Patole : चव्हाणांच्या प्रवेशानंतर पटोले भाजपवर भडकले; म्हणाले, 'निर्लज्जपणाची काहीतरी...'

Ashok Chavan and Nana Patole : अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली.
Ashok Chavan and Nana Patole
Ashok Chavan and Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे याचा काहीसा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. चव्हाणांसोबत अजून काही आमदारही पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे. (Nana Patole On Ashok Chavan Resignation)

अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली. यानंतर आता नाना पटोले यांनी ट्विट करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच भाजपची स्मरणशक्ती कमजोर असून, ते जनतेला मूर्ख समजत आहेत, अशा शब्दांत प्रहार करत निर्लज्जपणाचीदेखील काहीतरी एक सीमा असते, असा घणाघात पटोलेंनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाना पटोले 'एक्स'वर काय म्हटले ?

''भाजपची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मूर्ख समजतात.

भाजपचे आरोप : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत.

कृती : अशोक चव्हाण यांच्यामागे ईडी, सीबीआय यांचा ससेमिरा लावला.

परिणाम : अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपत दाखल.

आता प्रश्न असा आहे की, कालपर्यंत जे तुम्हाला भ्रष्ट वाटत होते, त्यांनी नेमकं असं काय पुण्य केलं ते अचानक तुम्हाला पूजनीय वाटू लागले ? निर्लज्जपणाचीदेखील काहीतरी एक सीमा असते'', अशा कडक शब्दांत नाना पटोलेंनी भाजपला सुनावलं आहे.

दरम्यान, भाजपने 2019 मध्ये त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पुण्यातील जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. आता हेच ट्विट नाना पटोले यांनी शेअर करत भाजपला अशोक चव्हाण अचानक पूजनीय का वाटू लागले ? असा सवाल करत भाजपला सुनावलं आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Ashok Chavan and Nana Patole
Ashok Chavan Resignation : पटोलेंच्या जागी थोरात; महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com