राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काल (12 फेब्रुवारी) काँग्रेसची साथ सोडून हाती 'कमळ' घेतलं. काँग्रेससाठी हा मोठा धक्का असला, तर त्या धक्क्यातून सावरण्याची जबाबदारी निष्ठावंत आणि संयमी नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे देणार असल्याची माहिती 'सरकारनामा'ला मिळाली आहे.
अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर दिल्लीतून वारंवार बाळासाहेब थोरातांना फोन येत होते. त्यामुळे पुढील सूत्रे थोरातांकडे जाण्याची शक्यता सांगितली जाते.
ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अशोक चव्हाणांसोबत किती आमदार जाणार, हेही अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
हे लक्षात घेऊन काँग्रेसमधील (Congress) डॅमेज कन्ट्रोलची जबाबदारी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वीकारण्याची सूचना दिल्लीतून करण्यात आली आहे. यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी थोरातांशी फोनवरून संवाद साधला आहे.
दोघांनीही बाळासाहेब थोरातांना (Balasaheb Thorat) आताची राज्यसभा निवडणूक लक्षात घेऊन संघटना बांधण्याची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली. तसेच अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील डॅमेज कंट्रोलची जबाबदारी थोरातांवर सोपवल्याचे कळते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची कायम चर्चा असते. काँग्रेस सोडलेल्या नेत्यांनी तशी नाराजीही व्यक्त केली आहे. शिक्षक-पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांचा अनुभव जगजाहीर आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली हायकमांडकडून सारवासारवीचा प्रयत्न होत आहे. शिवाय दोन-तीन महिन्यांत होऊ घातलेली लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय होऊ शकतो, याचीही चर्चा सुरू आहे.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.