Jalgaon politics : शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी फोन आला ; नगरसेवकाने ठणकावले : उद्धव ठाकरे म्हणाले...

Uddhav Thackeray News : शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटांच्या नगरसेविकेला पक्षात येण्यासाठी फोन करण्यात आला होता.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon News : शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटांच्या नगरसेविकेला पक्षात येण्यासाठी फोन करण्यात आला होता. त्यांनी सडेतोड उत्तर देत ठाकरे गटात राहण्याचा निश्चय व्यक्त केल्याने मुंबई येथून उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन करून शाबासकी दिली. शिंदे गटाच्या या प्रकारावर टीका केली.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन व त्यांच्या पत्नी नगरसेविका कल्पना दशरथ महाजन शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे आहेत. कल्पना महजन यांच्या नावाने त्यांना ठाणे येथून शिंदे गटात येण्याबाबत फोन आला होता. त्यांचे पती दशरथ महाजन यांच्या क्रमांकावर हा फोन आला होता. त्यांनी आपली पत्नी ठाकरे गटात नगरसेविका आहेत, असे सांगितले.

Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray News : '' ...तर महाराष्ट्राला देशातच नव्हे तर जगात अव्वल केलं असतं !''; ठाकरेंनी बोलून दाखवली खंत

शिंदे गटात गेल्याचे आपल्याला तुमच्याकडून समजते आहे, तुम्ही माझे घर फोडत आहात असेही सांगितले. आम्ही ठाकरे गटातच आहोत असे त्यांनी ठणकावून सांगितले. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर खुद्द शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्याची दाखल घेत थेट एरंडोल येथे दशरथ महाजन यांना रविवारी फोन केला व त्यांच्याशी संवाद साधला.

Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray Sabha News : `एक फुल दोन हाफ`, उद्धव ठाकरेंनी उडवली शिंदे-फडणवीस-पवारांची खिल्ली..

तुम्ही माझ्या सोबत आहात ना असे विचारले, तसेच शिंदे गटाचे नाव न घेता त्यांचा किती नालायकपणा सुरू आहे, अशी टीका केली. आपण जळगाव (Jalgaon) येथे येत आहोत त्यावेळी भेटू असेही त्यांनी महाजन याना सांगितले. ही क्लिप आता व्हायरल होत असून जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.