Nana Patole News : ''प्रफुल्ल पटेल अमित शाहांनी दिलेली स्क्रिप्ट वाचत आहेत''

Congress News : राज्याच्या राजकारणात 13 महिन्याच्या आत महाविकास आघाडीमध्ये भूकंप घडला आहे.
Nana Patole, Praful Patel News
Nana Patole, Praful Patel NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याच्या राजकारणात 13 महिन्याच्या आत महाविकास आघाडीमध्ये भूकंप घडला आहे. शिवसेनेमध्ये ज्याप्रमाणे फूट पडली होती त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांना भाजपाकडून देण्यात येणाऱ्या स्क्रिप्टनुसार बोलत असल्याची टीका काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ज्याप्रमाणे शिवसेना (Shivsena) पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. त्याप्रमाणेच आता अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले प्रफुल्ल पटेल यांना 10 जूनला म्हणजेच राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी शरद पवार यांनी कार्याध्यक्षपदी नियुक्त केले होते.

Nana Patole, Praful Patel News
Shiv Sena MLA Disqualification: मोठी बातमी, 16 आमदार अपात्रतेबाबत ठाकरे गटाची याचिका; 'अध्यक्षांना लवकरात निर्णय...'

ज्यानुसार पक्षाच्या संदर्भातील निर्णय घेण्याचा हक्क त्यांना देण्यात आलेला आहे. त्यानुसार पटेल यांनी संघटनात्मक बदल करत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांच्याजागी सुनील तटकरे यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच पक्षासंदर्भातील जी वक्तव्ये एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापुर्वी केली होती तशीच वक्तव्ये प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीबाबत करत आहेत. त्यावरुन नाना पटोले (Nana Patole) यांनी पटेल यांच्यावर टिका केली.

Nana Patole, Praful Patel News
Maharashtra Politics: अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलीच कॅबिनेट बैठक; सरकारने घेतले 'हे' आठ मोठे निर्णय

काँग्रेसच्या विधिमंडळाच्या बैठकी करिता नाना पटोले आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलताना ते म्हणाले की राष्ट्रवादीच्या ज्या आमदारांनी आणि नेत्यांनी बंडखोरी केली त्यांना भाजपा जे सांगत आहे ते बोलावेच लागेल. प्रफुल्ल पटेल जे काही रोज बोलत आहेत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्क्रिप्ट तयार करुन दिली असले. त्याच पद्धतीने त्यांना बोलावे लागते. जर का नाही बोलले तर काहीही होऊ शकते. भाजपाचा (BJP) फॉर्मुला ठरलेला आहे. सत्तेत या नाही तर जेलमध्ये जा, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com