
Mumbai News : महायुती सरकारमधील मंत्र्यांचा आज सायंकाळी शपथविधी झाला. त्याचवेळी विरोधक सत्ताधाऱ्यांविरुद्ध आक्रमक झाले. नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे. तत्पूर्वी सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.
बीडमधील सरपंचाचा खून करणाऱ्यांना पाठबळ असणाऱ्या नेत्याला मंत्रिपदाची शपथ दिली जात आहे. राजकीय गुंडांना आश्रय देणारे सरकार असेल, तर चहापानाला जाण्यात काय अर्थ आहे, असा घणाघात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
महायुती (Mahayuti) सरकारमधील मंत्र्यांचा आज शपथ झाला. त्याचवेळी नागपुरात अधिवेशनासाठी दाखल झालेल्या विरोधकांची बैठक झाली. या बैठकीत अधिवेशनापूर्वी सत्ताधाऱ्यांकडून आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. एका सरपंचाला उचलून नेत त्याचा खून होतो. त्या प्रकरणात राजकीय आरोपी आहेत, असे प्रथमदर्शनी तरी समोर येत आहे. सरपंचांचा खून करणाऱ्यांना पाठबळ असणाऱ्या नेत्याला मंत्रिपदाची शपथ दिली जात असल्याची चर्चा आहे. राजकीय गुंडांना आश्रय देणारे सरकार असेल, तर चहापानाला जाण्यात काय अर्थ नाही, अशी टीका काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
महाराष्ट्राची प्रगतीवर सरकाराला बोलायला वेळ नाही. महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे. शेतकरी आत्महत्या करतोय. बेरोजगारी वाढली आहे. राज्यात नवीन गुंतवणूक येत नाही. गुंतवणुकदारांमध्ये महाराष्ट्राबाबत अनास्था आहे. शेतकरी रडतोय. भाव मिळत नाही. अशी परिस्थितीत पीक विम्यापासून ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंत सर्व मुद्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे. या अधिवेशनात त्यावर चर्चा अपेक्षित आहे. परंतु त्यावर चर्चा करायला सरकारला वेळ नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले आहे. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. सर्वसामान्य संरक्षण मागतो आहे. यावर सरकार गंभीर नाही. सरकारीची या अधिवेशनात अल्पावधीत भूमिका दिसते. त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार घातला आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.