Nagpur Congress
Nagpur Congress Sarkarnama

Congress News : काँग्रेस मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करत 'या' दिवशी विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार!

Congress and Vidhan Sabha Election : जाणून घ्या, काँग्रेसने कोणता मुहूर्त काढला आहे? ; पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांना पत्र लिहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत .
Published on

Congress Mumbai Rally News : आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, आता प्रचाराचा तोफा धडाडण्यास सुरुवातही होत आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आपली ताकद राज्यात वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष आणि लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसनेही यासाठी पाऊल उचललं आहे.

दिवंगत काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त 20 ऑगस्ट रोजी बीकेसी मैदान मुंबई येथे काँग्रेस पक्षाकडून भव्य जाहीर सभा घेण्यात येणार आहे. याच दिवशी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे .

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेच्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी(Rahul Gandhi), सरचिटणीस वेणूगोपाल, प्रभारी रमेश चेंनीथला हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षाचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा मंचावर उपस्थित असतील .

Nagpur Congress
Nana Patole News : पक्षविरोधी कारवाई करणाऱ्याला अभय देणार नाही; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले

आगामी विधानसभा निवडणुका(Vidhan Sabha Election) डोळ्यासमोर ठेवून मुंबईत काँग्रेस पक्षाकडून शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. यासाठी राज्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांना पत्र लिहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत .

Nagpur Congress
Maharashtra Congress: लोकसभेला महाराष्ट्रात सर्वात मोठा भाऊ ठरल्यानंतरही विधानसभेला काँग्रेससाठी धोक्याची घंटा!

दरम्यान, पक्षांविरोधी कारवाई करणाऱ्या कोणाला ही माफ केले जाणार नाही. ज्यांनी व्हीप तोडले त्यांना ही माफ केले जाणार नाही. राष्ट्रीय महासचिव यांनी ही भूमिका घेतली आहे. काही टेक्निकल मुद्दे आहेत, जे बोलू शकत नाही. काँग्रेसची(Congress) एकदम स्पष्ट भूमिका आहे. तळागळातील कार्यकर्ते ज्यांनी कायम काँग्रेसचा विचार केला त्यांना आता प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांचा सन्मान आता आम्ही करणार आहोत, काँग्रेस हायकमांडने ही माहिती दिली आहे. कोणाला ही आम्ही अभय दिलेला नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी स्पष्ट केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com