Maharashtra Congress: लोकसभेला महाराष्ट्रात सर्वात मोठा भाऊ ठरल्यानंतरही विधानसभेला काँग्रेससाठी धोक्याची घंटा!

Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस अॅक्शन मोडवर आली आहे.महाविकास आघाडीतील जागावाटप हे लोकसभेच्या मेरिटनुसार व्हावं यासाठी काँग्रेस आग्रही होते.मात्र...
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Congress News : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरेल असं जर कोणी विधान केलं असतं तर नक्कीच्या त्यावर कोणीच विश्वास ठेवला नसता. मात्र, काँग्रेसनं ते करुन दाखवत लोकसभेला राज्यात तब्बल 13 आणि आधी अपक्ष आणि निवडून आल्यानंतर काँग्रेसला पाठिंबा दिलेल्या सांगलीच्या विशाल पाटलांसह एकूण 14 जागांवर विजय खेचून आणला.

आता याच काँग्रेससाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे. आधी मेरिटनुसार जागावाटपासाठी आग्रही असलेले काँग्रेस (Congress) पक्ष आता मतदारसंघातील अहवालानंतर तिकीट द्याचं की नाही याबाबत निर्णय घेणार आहे.

महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चांगलाच कॉन्फिडन्स वाढला आहे.काँग्रेसने आता महाराष्ट्रात विशेष लक्ष देतानात मोर्चेबांधणीवर भर दिला आहे.तसेच पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येणार असल्याचे संकेत हायकमांडकडून देण्यात आले आहेत. पण एकीकडे काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू असतानाच आता त्यांच्या सीटिंग आमदारांच्या जागाही धोक्यात असल्याची माहिती समोर येत आहे.

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस अॅक्शन मोडवर आली आहे.महाविकास आघाडीतील जागावाटप हे लोकसभेच्या मेरिटनुसार व्हावं यासाठी काँग्रेस आग्रही होते.मात्र, विधानसभेत याच मुद्द्यावरुन काँग्रेस पक्ष माघार घेणार असल्याची चर्चा आहे.

Mahavikas Aghadi
Raosaheb Danve : महायुती असताना हात दाखवणाऱ्या खोतकरांविरुद्ध दानवेंनी टाकला डाव..

जो सीटिंग आमदार आहे, त्यालाही तिकीट द्यायचं की नाही हे अहवाल घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. प्रत्येक जागांची चाचपणी केली जाणार आणि जर अहवाल आमदारांच्या विरोधात असेल तर तिकीट नाकारलं जाणार असल्याची भूमिका काँग्रेस पक्ष घेणार आहे.

लोकसभेत जिथे सीटिंग खासदार आहे, ती जागा त्या पक्षाने लढवावी ही भूमिका काँग्रेसची होती. मात्र, विधानपरिषदेत क्रॉस वोटिंग झाल्याने पक्षाने विधानसभा निवडणूकीत रिस्क न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या सीटिंग आमदारांच्या सीट्स देखील धोक्यात आल्या आहेत. सर्व आमदारांच्या कामाचा आराखडा तयार केला जाणार आणि मग जागा लढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Mahavikas Aghadi
Maharashtra Politics : तिसरी आघाडी सुसाट! राजू शेट्टीनंतर बच्चू कडू अन् इम्तियाज जलील वाढवणार महायुती, आघाडीचं टेन्शन

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीदेखील आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि क्रॉस व्होटिंग करणार्या आमदारांवरील कारवाईवर भाष्य केले आहे. ते म्हणाले,पक्षविरोधी कारवाई करणार्यांना कोणाला ही माफ केलं जाणार नाही.ज्यांनी व्हीप तोडलं त्यांना ही माफ केलं जाणार नाही.

राष्ट्रीय महासचिव यांनी ही भूमिका घेतली आहे.काही टेक्निकल मुद्दे आहेत,जे बोलू शकत नाही. काँग्रेसची एक्दम स्पष्ट भूमिका आहे तळागळातील कार्यकर्ते ज्यांनी कायम काँग्रेसचा विचारलं केला त्यांना आता प्राधान्य दिलं जाणार आहे.त्यांचा सन्मान आता आम्ही करणार आहोत. काँग्रेस हायकमांडने ही माहिती दिली आहे.कोणालाही आम्ही अभय दिलेलं नाही असं स्पष्टीकरणही पटोले यांनी दिलं आहे.

Mahavikas Aghadi
Video Ambedkar vs Kadu : बच्चू कडूंचा 'तो' सवाल अन् प्रकाश आंबेडकरांनी फटकारलं; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com