Congress News : कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेस लागली लोकसभेच्या तयारीला; येत्या २ व ३ जूनला मतदारसंघनिहाय बैठका

त्यात प्रत्येक मतदारसंघाचा सर्व बाजूने विचार करण्यात येणार आहे.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्या यशाची स्फूर्ती घेऊन महाराष्ट्रातील काँग्रेस नेतेही कामाला लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने येत्या २ आणि ३ जून रोजी बैठक आयोजित केली आहे. त्या बैठकीला राज्यातील सर्व प्रमुख नेते आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. त्यात प्रत्येक मतदारसंघाचा सर्व बाजूने विचार करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. (Congress will hold meetings on June 2 and 3 to prepare for the Lok Sabha elections)

दरम्यान, धर्मांध आणि जातीवादी भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे, हेच काँग्रेस पक्षाचे (Congress) लक्ष्य आहे. त्यामुळे आगामी लोकसभा (Loksabha) निवडणूक (Election) पूर्ण ताकदीने लढण्याचा पक्षाचा निर्धार आहे, असेही पटोले यांनी म्हटले आहे.

Congress
Fadnavis on Kirtikar : शिंदे गटातील खासदारांच्या नाराजीचा विषय फडणवीसांनी दोन वाक्यात संपवला

येत्या दोन आणि तीन जूनला प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठका होणार आहेत. त्या बैठकींना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाचे सर्व माजी मंत्री, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील तसेच प्रदेश निवडणूक समन्वय समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

Congress
BJP Vs Shinde Group : भाजप-शिंदे गटात वादाची ठिगणी : ‘आम्हाला सन्मान मिळत नाही, सापत्न वागणूक मिळते’; खासदारांचा हल्लाबोल

लोकसभा मतदार संघातील प्रमुख नेते, जिल्हा प्रभारी, आजी माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार, जिल्ह्यातील आघाडी संघटना व विभागाचे अध्यक्ष मुंबईतील टिळक भवन या पक्ष कार्यालयात होणाऱ्या बैठकीला येणार आहेत.

पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार मागील ९ वर्षांपासून देशाला अधोगतीकडे घेऊन जात आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाच्या सरकारने भारताला जगात एक महाशक्ती म्हणून उभे केले. पण, नरेंद्र मोदी सरकारने केवळ ९ वर्षांत देशातील सर्व वैभव विकण्याचा सपाटा लावला आहे. देश विकून देश चालवला जात आहे. जाती-धर्मांमध्ये विष कालवून राजकीय पोळी भाजण्याचे पाप केले जात आहे.

Congress
Cabinet Expansion : मंत्रिपदासाठी ५० आमदारांचे दिल्लीत लॉबिंग; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा निष्ठावंतांसाठी जोरदार आग्रह

नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेश व कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेने भरघोस मतदान करत विजयी केले आहे. या विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही भारतीय जनता पक्षाला धूळ चारू असा, निर्धार प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी बोलून दाखवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com