Congress Core Committee : आघाडीत घडामोडींना वेग; अधिवेशनापूर्वीच काँग्रेस लोकसभेच्या जागांबाबत घेणार मोठा निर्णय !

Congress Core Committee Meting :राज्यात जंगलराज, कायदा सुव्यवस्थेबाबत राज्यपालांची भेट घेणार
Nana Patole, Sushilkumar Shinde, Ashok Chavan
Nana Patole, Sushilkumar Shinde, Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Congress Meeting In Mumbai : मुंबई येथे काँग्रेसच्या कोअर कमिटीची बुधवारी (ता. २८) बैठक पार पडली. यावेळी राज्यातील कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांच्या समस्या, पावसामुळे मुंबईची झालेली अवस्था याबाबत चर्चा करण्यात आली. या विषयांबाबत वेळ पडली राज्यपालांकडे जाण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीत लोकसभेच्या जागांचाही आढावा घेण्यात आला. तसेच लोकसभेतील जागावाटपाबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच अंतिम निर्णय घेण्याचीही तारीख ठरवण्यात आली. (Latest Marathi Political News)

काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, बस्वराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होते. बैठकीनंतर लोकसभेच्या जागावाटपाबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, " आजच्या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला. याबाबत पुन्हा ६ तारखेला बैठक घेऊन अंतिम चर्चा होईल. त्यानंतर अधिवेशनाआधी मित्रपक्षांशी चर्चा करण्यात येणार आहे.

Nana Patole, Sushilkumar Shinde, Ashok Chavan
Monsoon session News : पावसाळी अधिवेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात; नव्या संसद भवनात होणाऱ्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय?

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, "आजच्या बैठकीत १५ ते २० जागांवर चर्चा झाली आहे. अजून पूर्ण चर्चा झालेली नाही. पुढील बैठक ६ तारखेला होईल. सध्या काही जागांवर साधक-बाधक चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीसोबत आम्ही चर्चा करत आहोत. वज्रमूठ सभांना थोडा वेळ झाला आहे. हे आम्ही नाकारत नाही."

या विषयांवर चर्चा

काँग्रेसच्या आजच्या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा झाली. पाऊस उशिरा पडल्याने दुबार पेरणीचे संकट असून शेतकऱ्याला खते, बियाणे मोफत द्यावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच वेळपडली तर राज्यपालांकडे जाण्याचाही निर्यण यावेळी घेण्यात आला आहे. पावसामुळे मंबईत सहा लोकांचा हकनाक बळी गेला. मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांची प्रचंड झाले आहे. त्यामुळे खर्च केलेले कोट्यवधी रुपये कुठे गेले? असाह सवाल उपस्थित करून याबाबत राज्यसरकारला प्रश्न विचारण्यात येणार आहे.

Nana Patole, Sushilkumar Shinde, Ashok Chavan
BRS Maharashtra News : 'केसीआर' आघाडीचे टेन्शन वाढवणार? ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत : प्रकाश आंबेडकरांना दिला 'हा' प्रस्ताव...

राज्यात जंगलराज

यावेळी नाना पटोले यांनी राज्यात सध्या जंगलराज सुरू असल्याचे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, पुण्यात दिवसाढवळ्या एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले. महिला, मुलींवरील हल्ले, लैंगिक अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. महिलांसाठी सुरक्षित असलेले मुंबई शहर व महाराष्ट्रात सध्या बिहार, उत्तरप्रदेशसारखे जंगलराज झाले आहे. याबाबत राज्यपाल व पोलीस महासंचालकांना माहिती दिली, मात्र सुधारणा झालेली नाही. आता वेळप्रसंगी कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर काँग्रेस रस्त्यावर उतरेल."

मूळ प्रश्नांपासून भाजपचा पळ

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. याबाबत नाना पटोले म्हणाले की, "भाजप मूळ मुद्द्यांपासून पळ काढत असतो. शेतकरी, बेरोजगारी, महागाईवर काय केले त्यावर भाजपकडे उत्तर नाही. त्यामुळे ते हास्यकल्लोळ करण्याचा प्रयत्न करत असतात. पण जनता त्यांच्या हास्यकल्लोळला ओळखून आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. ही टीका भाजपाला महागात पडणार आहे."

Nana Patole, Sushilkumar Shinde, Ashok Chavan
Abu Azmi Threat Call: आमदार अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

बीआरएस कुणाची टीम ?

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा महाराष्ट्रातील प्रवेशाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावर चव्हाण म्हणाले यांनी सांगितले की, सध्या बीआरएस कोणत्याही बैठकीत भाजपविरोधात भूमिका घेत नाहीत. पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीला ते अनुपस्थित राहिले होते. यावरून ते कोणाची बी टीम आहेत हे स्पष्ट होते. ऐन निवडणुकांआधी हे सगळे सुरू झाले आहे."

प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री नसीम खान यांनी नाशिकमधील घटनेकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, "नाशिक जिल्ह्यात मॉब लिंचिंगच्या दोन घटना झाल्या आहेत. यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनांवरून राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही हे स्पष्ट होते. राज्य सरकार या घटनांकडे राजकीय फायद्यासाठी दुर्लक्ष करत आहे का, हा प्रश्न आहे. सरकारने या दोन्ही घटनांचा गांभिर्याने तपास करावा व गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याचा प्रयत्न करावा."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com