'महाराष्ट्रात शस्त्रे आणून दंगली घडण्याचे षडयंत्र'

BJP| Ram Kadam| Congress| महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र कोण पोहचवतयं?
 Ram Kadam|BJP|
Ram Kadam|BJP|Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : धुळे, जालन्यात अलीकडेच तलवारी जप्त करण्यात आल्या. या शस्त्रांवरुन आता भाजप (bjp) नेते राम कदम यांनी ठाकरे सरकावर आणि कॉंग्रेसवर (Congress) निशाणा साधला आहे. राजस्थानमधून या तलवारी महाराष्ट्रात आणण्यात आल्याचा दावा राम कदम यांनी केला आहे.

''धुळ्यात ९० तलवारी जप्त करण्यात आल्या, राजस्थानातून तलवारी जालन्यात नेण्यात येणार होत्या, राजस्थानातून जालन्यात तलवारी नेण्याचे काय कारण, कोणाला या तलवारी घेऊन कोणाला मारायचं आहे. कोणाला दंगली करायच्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र जालन्याला कोण पाठवतयं, कोणाला पाठवतयं, ज्या ठिकाणी कॉंग्रेसच सरकार आहे तिथूनच या तलवारी कशा येतात, हा योगायोग आहे की ठरवून केलेलं षडयंत्र आहे, याचं कारण काय. असे अनेक सवाल राम कदम यांनी उपस्थित केले आहेत.

 Ram Kadam|BJP|
मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर डोळा, मनसेला राष्ट्रवादीचे पाठबळ: आशिष शेलारांचा दावा

तसेच, याच्या आधीही पुण्याहून औरंगाबादला शस्त्रे चालली होती. त्याही तलवारी जप्त करण्यात आल्या, म्हणजे औरंगाबाद आणि जालन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र कोण पोहचवतयं, तीही ज्या ठिकाणी कॉंग्रेसचं सरकार आहे, तिथूनच ही शस्त्रे कशी येतात, तिथलं सरकार झोपलं आहे का, ठाकरे सरकार याच्या मुळाशी जाऊन याची चौकशी करणार का, असाही सवाल राम कदम यांनी केला आहे.

दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी औरंगाबाद शहरात एकाच वेळी ३७ तलवारी कुरियरने मागवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर या तलवारी जप्त करण्यात आल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी कुरिअरने मागवल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली होती. तर बुधवारी (२७ एप्रिल) धुळ्यातील सोनगीर पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान एका गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीत 90 तलवारी आढळून आल्या. या प्रकरणी धुळे पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं असून 7 लाख 13 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमालही जप्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com