BMC NEWS : कार्यालय कुणाचे?; ठाकरे-शिंदे गटातील वाद चिघळला..

Thackeray Shinde Clash : शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत यशवंत जाधव यांच्या बोर्डला शाई फासली.
BMC NEWS
BMC NEWS Sarkarnama
Published on: 
Updated on: 

BMC NEWS : मुंबई महापालिकेत असणाऱ्या शिवसेनेच्या कार्यालयावरून बुधवारी ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठा राडा झाला. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची देखील झाली होती. शिंदे गटाने महापालिकेतील ठाकरे गटाच्या कार्यालयावर ताबा मिळवला होता. मात्र पोलीस आणि महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही गटातील तणाव निवळला.

मात्र आज पुन्हा एकदा मुंबई महापालिकेत ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावाच्या बोर्डला शिवसैनिकांनी लाल शाई फासली. यशवंत जाधव हे शिंदे गटाचे आहेत. तर जाधव यांचं बोर्डवरील नाव मिटवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

BMC NEWS
Election Commission News: निवडणूक आयोगाची 'ही' मोठी घोषणा; स्थलांतरीत विद्यार्थी आणि नोकरदारांना लाभ होणार

दरम्यान, बुधवारी झालेल्या दोन्ही गटाच्या राड्यानंतर मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. यानंतर होणारा संभाव्य वाद टाळण्यासाठी महापालिकेने आपल्या इमारतीमधील सर्व पक्षाचे कार्यालये सील केले आहेत. याबाबत संबधित कार्यालयावर नोटीसा देखील लावण्यात आल्या. मात्र आज पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत यशवंत जाधव यांच्या नावाच्या बोर्डला लाल शाई फासली.

BMC NEWS
RSS कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी लिंब टाकलीत का तपासा ? ; असं ठाकरे भागवतांना का म्हणाले..

तसेच शिवसेना (Shiv Sena) कार्यालय सुरु होत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाहीत अशी भूमिका घेत ठाकरे गटाने ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे आज मुंबई (Mumbai) महापालिकेत काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आता ठाकरे गट आणि शिंदे गटातील हा वाद मिटणार का? की आणखी चिघळणार? हे येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com