Youth Congress News : युवक काँग्रेसमधील वाद उफाळला ; बैठकीत तुफान हाणामारी...

Congress News : युवक काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचा अंतर्गत वाद उफाळला आहे.
Youth Congress News
Youth Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : युवक काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचा अंतर्गत वाद उफाळला आहे. युवक काँग्रेसच्य बैठकीत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. दोन गटात तुफान हाणामारी होताना कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, युवक काँग्रेसच्या बैठकीत दोन गटात हाणामारी झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या आहेत. युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात काही कार्यकर्ते भिडले आहेत. शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे या गटाने कुणाल राऊत यांचा विरोध केला आहे.

Youth Congress News
Shashi Tharoor Alert Congress : कर्नाटकातील विजयाने अति उत्साही होऊ नका ; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा घरचा आहेर

युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांच्या कामकाजावर या गटाने नाराजी व्यक्त केली. या गटाने त्यांना बदलण्याची मागणी केली आहे. त्यानंतर बैठकीत काही कार्यकर्ते आक्रमक झाले. यावरुन वाद होऊन बैठकीत दोन गट एकमेकांना भिडले. यावेळी काही कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्याची घटना घडली. युवक काँग्रेसच्या (Congress) चार उपाध्यक्षांनी राऊत यांना पदावरून हटविण्याची मागणी केली. यामुळे बैठकीत चांगलाच वाद झाला.

Youth Congress News
Maharashtra Congress : काँग्रेस नेत्यांचे दिल्ली दौरे वाढले; चव्हाण, पटोलेनंतर आज पृथ्वीराजबाबा दिल्लीत...भाकरी फिरणार

दरम्यान, काँग्रेसने नुकतेच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरुन भाई जगताप यांना हटवले आहे. त्यांच्या जागी माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती केली आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष पदावरुनही मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत. त्यातच आता युवक काँग्रेसचे प्रकरण समोर आल्यामुळे या काय पडसाद उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com