मलिकांना न्यायालयाचा मोठा दिलासा; तिन्ही मागण्या केल्या मान्य

राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटेकवरून वातावरण तापले आहे.
Nawab Malik
Nawab Malik Sarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. न्यायालयाने मलिक यांची 3 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. आता न्यायालयाने मलिक यांना मोठा दिलासा दिला असून, त्यांच्या तिन्ही मागण्या मान्य केल्या आहेत. (Nawab Malik ED)

नवाब मलिक यांच्या तिन्ही मागण्या न्यायालयाने मान्य केल्या आहेत. मलिक यांनी काल (ता.23) न्यायालयाकडे या तीन मागण्या केल्या होत्या. ईडीच्या कोठडीत असताना घरचे जेवण मिळावे, चौकशीदरम्यान आपल्या वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी आणि रोजची औषधे घेऊ द्यावीत, अशा तीन मागण्या करण्यात आल्या आहेत. या तिन्ही मागण्यांना न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. दरम्यान, मलिक यांच्या अटकेनुसार राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे घटक पक्ष आंदोलन करीत आहेत. मलिक यांच्या अटकेनंतर सरकारमधील तिन्ही घटक पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

ईडीकडून अशा प्रकारची कारवाई होणार ही माहिती दोन-तीन महिन्यांपूर्वीच मलिक यांना मिळाली होती. खुद्द मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक (Nilofer Malik) यांनी याबाबत गौप्यस्फोट केला आहे. निलोफर मलिक म्हणाल्या की, ईडी आमच्यावर कारवाई करणार हे दोन-तीन महिन्यांपूर्वीच त्यांना माहिती झाले होते. माझ्या वडिलांनी मला आपण काही चुकीचे केले नसून, काळजी घेण्यास सांगितले होते. माझे वडील निर्भीडपणे बोलत होते. त्यामुळे त्यांच्या मागे ईडी आणि एनसीबीचा ससेमिरा लावण्यात आला. माझे वडील यातून बाहेर याची मला खात्री आहे. ही न्यायालयीन लढाई असून, ती आम्ही लढणार आहोत. सार्वजनिक जीवनात काम करीत असलेल्या प्रत्येक मुस्लिमाचे नाव डी-कंपनीशी जोडले जाते. हे अतिशय चुकीचे आहे.

Nawab Malik
संजयबाबा म्हणाले, मुश्रीफांकडून पराभूत झालो ते बरंच झालं...

मलिक यांना कोठडी सुनावल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारने मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीत मलिक यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. काल (ता.23) ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर मलिक यांनी `नही झुकेंगे और भी लढेंगे, सबको एक्सपोज कर देंगे` अशी प्रतिक्रिया दिली.

Nawab Malik
एका शीख मुलीमुळं मुस्लिम मुलींना मिळाली महाविद्यालयात हिजाबची परवानगी!

अटक झाल्यानंतर नबाव मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. तिथून त्यांना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीने त्यांच्या कोठडीची मागणी केली. खुद्द मलिक यांनी मला कोणतेही समन्स नव्हत, मला जबरदस्तीने येथे आणले, असा दावा न्यायालयात केला. मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले, असा दावा करत हे 'टेरर फंडिंग` असल्याचा युक्तिवाद ईडीने केला. अखेर न्यायालयाने त्यांची ईडीच्या कोठडीत रवानगी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com